जिजाऊ संस्थेतर्फे खावडी येथे विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शनासह मोफत शैक्षणिक साहित्य वाटप
लांजा : जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून दि. १७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी श्री करंडा देवी खावडी ता.लांजा जिल्हा रत्नागिरी येथे विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन व मोफत वह्या वाटप करण्यात आले.
जिजाऊ संस्थेचे सचिव श्री. केदार चव्हाण यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याबद्दलची माहिती उपस्थितांना दिली तसेच करियर बद्दलचे मार्गदर्शन हे आपल्या मुलांना योग्य वेळी आणि योग्य प्रकारे जर मिळाले तर कोकणातील ग्रामीण भागातून देखिल प्रशासकीय अधिकारी घडतील, हा विश्वास त्यांनी वेळी व्यक्त केला आणि म्हणून जिजाऊ संस्थेचे संस्थापक श्री.निलेश सांबरे साहेब यांच्या संकल्पनेतून ही मोहीम संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात राबवण्यात येत आहे, असे सांगितले.
जिजाऊचे प्रकल्प संचालक श्री.संदीप पाटील यांनी गावातील उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना अपारंपरिक व विवध करियरच्या संधी बाबत जागृत केले.शालेय स्तरीय स्पर्धा परीक्षा ,दहावी व बारावी नंतर काय? MPSC / SSC /बॅंकिंग व कॉलेज ऑफ मिलेटरी इंजिनिअरिंग /NDA/SPI/TISC अशा अनेक संधीची सविस्तर माहिती दिली व यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले ..
याप्रसंगी जिजाऊ संस्था लांजा तालुकाप्रमुख श्री.योगेश पांचाळ ,खावडी गावचे उपसरपंच श्री.विघ्नेश गुरव,ग्रामपंचायत सदस्य जयेश गुर,करंडादेवी सेवा मंडळ अध्यक्ष श्री दिनेश गुरव,गोळवशी गावचे पोलिस पाटील श्री महेश वीर,कोंड्ये गावचे उपसरपंच श्री सुनील नाटेकर,पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा मुख्याधापक श्री मनोहर म्हाद्ये सर,कुर्णे गावचे सार्थक राजाराम गुरव,श्री.ऋग्वेद शशिकांत पांचाळ,खावडी गावचे ग्रामस्थ श्री चंद्रकांत गुरव तसेच विद्यार्थी व पालक यांची उपस्थिती लाभली.