अफवांना बळी न पडता महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना विजयी करा : तालुकाप्रमुख प्रमोद पवार
देवरूख : भाजपा- शिवसेना- राष्ट्रवादी महायुतीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शिवसेनाचे संगमेश्वर तालुकाप्रमुख प्रमोद पवार यांनी आपल्या कार्यकर्तेंसह तालुक्यात विविध ठिकाणी बैठका घेऊन मार्गदर्शन केले.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या युती धर्माचे पालन करण्याच्या आदेशानुसार शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोद पवार यांनी ओझरे जि. प. गटातील मारळ, आंगवली, निवे, निवधे, कासारकोळवण, हातीव मुरादपूर आदी गावांमध्ये वाडीवस्तीवर युतीच्या पदाधिकारी यांच्या सह बैठकांचे आयोजन करुन महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना निवडून देण्यासाठी विरोधी पक्षाच्या अफवांना व खोट्या अमिषांना बळी न पडता प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन केले.
यावेळी तालुका संघटक पपू गायकवाड ,मारळचे प्रसाद सावंत. कासारकोळवणचे माजी सरपंच सचिन मांगले. युवासेना. महीला आघाडीचे पदाधिकारी तसेच भाजपा व राष्ट्रवादी आदींचे पदाधिकारी उपस्थित होते.
या ओझरे जिप गटात राणे यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आ. शेखर निकम. माजी आ. व सेनेचे नेते सदानंद चव्हाण. भाजपचे जिल्हाध्यक्ष सावंत. महीला जिल्हाध्यक्ष सौ. सुजाता साळवी यांच्या उपस्थितीत लवकरच युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सेनेचे युवा नेते सचिन मांगले यांनी दिली.