https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

राज्यात १८ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी जाहीर करावी

0 218
  • नसीम खान यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

मुंबई : माजी मंत्री व प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री व दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांना लेखी पत्राद्वारे महाराष्ट्रात ईद-ए-मिलादून नबीची सुट्टी 16 सप्टेंबर ऐवजी दि. 18 सप्टेंबर रोजी करण्याची मागणी केली.

नसीम खान यांनी त्यांच्या पत्रात लिहीले की, संपूर्ण विश्वाला शांतीचा भाईचाराचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर साहेबांचा (S.A.W) जन्मदिवस दिनांक 16 सप्टेंबर रोजी असून दि. 17 सप्टेंबर रोजी हिंदू बांधवांचा गणेश विसर्जन म्हणजे अनंत चतुर्दशीचा दिवस आहे. कॅलेंडरवर सुद्धा 16 सप्टेंबर सुट्टी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे.

दोन्हीही धर्माचे पवित्र अशा सणाचे पावित्र्य राखण्याच्या अनुषंगाने दिनांक 07 सप्टेंबर रोजी ऑल इंडिया खिलाफत कमिटी मध्ये मुंबई सहित महाराष्ट्रातील औरंगाबाद, जालना, मालेगाव, भिवंडी, ठाणे व इतर विविध मुस्लिम संघटनाची बैठक घेण्यात आली होती आणि त्या बैठकीत राज्यात बंधुभाव व हिंदू-मुस्लिम एकोपा अबाधित राखण्याकरिता हिंदू बांधवांचा अनंत चतुर्थी (गणेश विसर्जन) आणि मुस्लिम बांधवांच्या मोहम्मद पैगंबर साहेबांच्या (S.A.W) जन्मदिवशी काढण्यात येणारी मिरवणूक दिनांक 16 सप्टेंबर ऐवजी 18 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. जेणेकरून दोन्हीही धर्माचे सण प्रेम व सद्भावणाने साजरा करता येतील. या सर्व बाबी लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी 16 सप्टेंबर एवजी 18 सप्टेंबर रोजी राज्यात सुट्टी घोषित करावी अशी मागणी नसीम खान यांनी आपल्या पत्राद्वारे केली.

Leave A Reply

Your email address will not be published.