बीडमधील ज्युनियर राज्य तायकांदो स्पर्धेत रत्नागिरीला पाच पदके
रत्नागिरीतील युवा तायक्वांदो दोन सुवर्णपदकांसह तीन कांस्य पदके पटकावली
रत्नागिरी : ३४ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर क्युरोगी व 10 वी पूमसे चॅम्पियनशिप बीड 2024 – 25 तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व तायक्वांदो असोसिएशन बीड आयोजित राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत युवा रत्नागिरीच्या खेळाडूनी पाच पदके पटकावली आहेत.
या स्पर्धेमधील पदकप्राप्त खेळाडू पुढील प्रमाणे :
- अमेय भरत पाटील (सुवर्णपदक)
- सई संदेश सुवरे (सुवर्ण पदक )
- साधना भावेश गमरे (कास्य पदक)
- हर्षदा अशोक मोहित (कस्यपदक)
- सई संदेश सुवरे (कास्य पदक )
या सर्व पदकप्राप्त खेळाडूंचे प्रशिक्षक म्हणून तेजकुमार लोखंडे (राष्ट्रीय प्रशिक्षक) यांनी काम पहिले. यशस्वी खेळाडूंना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे महासचिव मिलिंद पठारे (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन अध्यक्ष श्री वेंकटेश्वर राव कररा (जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते ) रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन उपाध्यक्ष श्री शैलेश गायकवाड श्री.विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष श्री शशांक घडशी, संजय सुर्वे व सर्व पदाधिकारी तसेच कै. अन्नपूर्णा प्रभू संगीत कला विद्यालयाचे अध्यक्ष अनंतजी आगाशे युवा मार्शल तायकोंडो ट्रेनिंग सेंटरचे सर्व पदाधिकारी पालक प्रशिक्षक यांनी अभिनंदन केले.
विजेते सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक राम कररा, सहप्रशिक्षक सौ. शशिरेखा कररा, अमित जाधव, प्रतीक पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.