‘मुख्यमंत्री माझी शाळा’ योजनेसाठी लांजा शाळा क्र. ५ ची निवड
लांजा : लांजा शहरातील जिल्हा परिषद शाळा लांजा न 5 या शाळेला मुख्यमंञी माझी शाळा,सुंदर शाळा टप्पा-2 मध्ये जिल्हात प्रथम क्रमांकासाठी निवड झाली आहे.
लांजात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा 2 या स्पर्धात्मक अभियानचे नुकतेच मुल्यांकन झाले होते.
या अभियानात लांजा तालुक्यात प्राथमिक शाळा गटात लांजा न 5 ही शाळा प्रथम आली होती. पुन्हा जिल्हास्तरीय समिती ने जील्हात शाळांचे मूल्यांकन करून त्यात लांजा नंबर 5 या शाळेने बाजी मारली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा अभियानला मोठा प्रतिसाद प्रार्थमिक आणि माध्यमिक शाळा यांनी प्रतिसाद दिला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या अभियानाची नोंद झाली आहे.
या अभियानत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या शाळांना भरीव रकमेची बक्षीस ठेवण्यात आली आहेत लांजा तालुक्यात सर्व शाळांनी या अभियानात सहभागी घेतला आहे 150 गुण या अभियानात आहेत
लांजा न 5 ही शाळा स्मार्ट शाळा म्हणुन नावा रूपाला आहे या शाळेत विवीध उपक्रम राबविले जातात या निवडी बद्दल गट विकास अधिकारी संतोष म्हेत्रे, प्रभारी गट शिक्षणाधिकारी विनोद सांवग, केंद्र प्रमूख चंद्रकांत पावसकर यांनी अभिंनदन केले आहे