चिपळूण : येथील एसटी आगारामार्फत प्रवाशांच्या मागणीनुसार चिपळूण रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूस (गांधारेश्वर मंदिर) ते चिपळूण शहरात मध्यवर्ती बस स्थानकापर्यंत येणारी एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकातून चिंचनाका, वेस मारुती मंदिर, पवन तलाव, मुरादपूर, गांधारेश्वर मार्गे पश्चिम रेल्वे स्टेशन येथे मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांकरिता जाणार असून गेलेल्याच मार्गाने ती परत येईल.
तिकीट दर ₹ १०/-
तिकीट दर महिलांसाठी ₹ ०५/-
दादर ते सावंतवाडी मार्गावर धावणारी तुतारी एक्सप्रेस (११००३), मुंबई -सीएसएमटी ते मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस (१२०५१), दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस (१०१०५)
मत्स्यगंधा एक्सप्रेस १२६१९, दिवा रत्नागिरी पॅसेंजर (५०१०३) या गाड्यांच्या वेळेत ही बससेवा एसटीकडून सुरु करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांकडून याबाबत मागणी होत होती
मुंबई, बोरिवली, ठाणे, कल्याण, पनवेलहून येणाऱ्या प्रवाशांनी या रा. प. बस सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.