रत्नागिरी : याआधी केवळ रविवारी जाहीर करण्यात आलेल्या चिपळूण ते पनवेल आणि पनवेल ते रत्नागिरी या गाडीच्या फेऱ्या रविवार प्रमाणे सोमवार दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी देखील होणार आहेत. दिनांक ४ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२४ या कालावधीसाठी यापूर्वीच फक्त रविवारी ही गाडी चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यात आता आणखी काही फेऱ्यांची भर पडली आहे.
या संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार चिपळूण ते पनवेल आणि पनवेल ते रत्नागिरी मेमू ट्रेनच्या वाढीव फेऱ्यानुसार दोन ते पनवेल (01160) मार्गावर सोमवार दि 19 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी तीन वाजून 25 मिनिटांनी मेमू ट्रेन सुटेल. ही गाडी पनवेल ते रत्नागिरी मार्गावर (01159) याच दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी रत्नागिरी स्थानकावर पोहोचेल.
हे देखील वाचा : Konkan Railway | चिपळूण-पनवेल, पनवेल-रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारीपासून
चिपळूण ते पनवेल मेमू ट्रेनचे थांबे
अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामने, वीर, गोरेगाव, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण हमरापुर, जिते, आपटा, रसायनी आणि सोमटणे.
पनवेल- रत्नागिरी मेमू ट्रेनचे थांबे
सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजणी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.