घारापुरी बेट पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज!
उरण दि २४(विठ्ठल ममताबादे ) : ख्रिसमस व सरत्या वर्षानिमित्त दर वर्षी मोठ्या संख्येने पर्यटक जागतिक पर्यटन क्षेत्र असलेले उरण तालुक्यातील घारापुरी बेटावर येत असतात. चारही बाजुना समुद्र व मधोमध सुंदर असे डोंगर असे निसर्गरम्य हे पर्यटन क्षेत्र असल्यामुळे पर्यटक येथे मोठया प्रमाणात येत असतात. त्यामुळे गर्दीचेवेळी पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घारापुरी बेटावर काम पहात असलेल्यां सर्व विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक व्यवसायिक व ग्रामपंचायतीची कार्यकारिणी यांच्या समवेत दिनांक २३/१२/२०२३ रोजी एलिफंटा लेणी येथील भारतीय पुरातत्व विभागाचे हाॅलमध्ये बैठक घेण्यात आली.यावेळी बेटावर येणाऱ्या पर्यटकांना उद्भवणा-या समस्येवर चर्चा करून त्यावर उपाय योजना करण्याचे सर्व विभाग सज्ज असल्याचे सांगण्यात आले.
बैठकीचे सुरुवातीला नवनिर्वाचित नियुक्त झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांचे ग्रामपंचायतीचे वतीने स्वागत करण्यात आले.
सदरचे बैठकीसाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकुर, सदस्य सचिन लाड, सदस्या नीता ठाकुर,भारती पांचाळ,अरुणा घरत, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष सोमेश्वर भोईर,माजी उपसरपंच सचिन म्हात्रे, व्यवसायिक तथा जेष्ठ नागरिक यशवंत म्हात्रे, लोकल गाईडचे कृष्णा भोईर, भारतीय पुरातत्व विभागाचे श्री.शिंदे, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या एलिफंटा विभागाचे उप बंदर निरिक्षक विनायक करंजे, एलिफंटा सिक्युरिटी गार्डचे प्रमुख अजय झा व त्यांचे सहकारी गेट वे जलवाहतूक संस्थेचे प्रतिनिधी ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी माजी उपसरपंच सचिन म्हात्रे यांनी सदरची बैठक यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.
- हेही वाचा : Konkan Railway | कोकण रेल्वेची २ कोटी ५ लाख ५२ हजारांची दंडवसुली!
- Konkan Railway | दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस उद्यापासून विजेवर धावणार!
- Konkan Railway | ख्रिसमससाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी चार विशेष गाड्या