https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

Good News | रत्नागिरी जिल्ह्यात सीएनजीचं जाळे विस्तारणार!

0 3,797

मुंबई गोवा महामार्गावर खेड, चिपळूण, आरवली, लांजा साखरपा  अशा ठिकाणी नवीन सीएनजी स्टेशन उभारणार

रत्नागिरी : डिझेल-पेट्रोलच्या मर्यादित साठ्यामुळे पर्यावरणपूरक असलेला नैसर्गिक वायू म्हणजेच सीएनजीचा वापर इंधन म्हणून करण्याकडे कल वाढला असतानाच ही हरित चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात आणखी काही मोक्याच्या ठिकाणी सीएनजी स्टेशन्स उभारली जाणार आहेत.


इंधन म्हणून डिझेल पेट्रोलच्या लग्नाला भिडलेल्या किमती, त्यांचा मर्यादित साठा या सर्वांचा विचार करून नैसर्गिक वायूचा वापर करण्याकडे कल वाढू लागला आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 2019 20 मध्ये जिल्ह्यात सीएनजी गॅसचा पुरवठा होऊ लागला. सुरुवातीला रत्नागिरी या जिल्ह्याच्या मुख्य नया सह पाठोपाठ मुंबई गोवा महामार्गावर अवघ्या काही ठिकाणीच सीएनजी गॅसचा पुरवठा केला जात होता.


सीएनजी ( कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस ) हा वायू पर्यावरण पूरक असल्यामुळे प्रदूषण रोखण्यात त्याची मदत होत आहे. तुलनेने तो स्वस्तही आहे. वाहनांमध्ये इंधन म्हणून वापर करण्याबरोबरच रत्नागिरी शहरापासून तो घरगुती वापरासाठी पीएनजी ( पाईप नॅचरल गॅस ) देखील पुरवला जाऊ लागले आहे. स्वयंपाकासाठी घरगुती गॅस म्हणून त्याचा पुरवठा पाच वर्षापासून होऊ लागला आहे. आता या पर्यावरण पूरक गॅसचे सेवाक्षेत्र व्यापक केले जाणार आहे.

याआधी जिल्ह्यात अशोका गॅस कंपनीकडून ही सेवा पुरवली जात होती. आता मुंबई पुण्यासारख्या मोठ्या महानगरांमध्ये आधीपासूनच ही सेवा पुरवणाऱ्या महानगर गॅस या मोठ्या कंपनीने आधीच्या सेवा पुरवठादार कंपनीचा ताबा घेतला आहे. नव्या महानगर गॅस कंपनीने जिल्ह्यात पाच ठिकाणी नव्याने सीएनजी स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने जिल्ह्यातील ही नवी सीएनजी स्टेशन उभारण्यासाठी त्या त्या ठिकाणच्या लोकांना स्वतःचे सीएनजी स्टेशन उभारण्याची संधी देताना 4 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज मागविले आहेत.

गॅस पुरवठादार कंपनीच्या जाहिरातीनुसार मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड, चिपळूण, आरवली, लांजा (हातखंबा ते लांजा), साखरपा अशा पाच ठिकाणी नवीन सीएनजी स्टेशन उभारणारण्याचे प्रस्तावित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.