दुरंतो एक्सप्रेससह उधना मंगळूरु चार गाड्यांना डबे वाढवले
रत्नागिरी : कोकण रेल्वे मामार्गे धावणाऱ्या दूर पल्ल्याच्या गाड्यांना गर्दी वाढू लागल्यामुळे रेल्वेने चार गाड्यांना डबे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एलटीटी -एर्नाकुलम दुरंतो एक्सप्रेस तसेच उधना ते मंगळूरु या मार्गावरील विशेष गाडीचा यात समावेश आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते एर्नाकुलम (12223/12224) ही दुरंतो एक्सप्रेस तसेच उधना ते मंगळुरू दरम्यान धावणारी (09057/09058) ही विशेष गाडी या गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात अनुक्रमे चार व दोन स्लीपर श्रेणीचे डबे वाढवण्यात आले आहेत. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस ते एर्नाकुलमदरम्यान धावणाऱ्या दुरंतो एक्सप्रेस ला दिनांक 18 नोव्हेंबर 2023 ते 28 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी स्लीपर श्रेणीचे चार डबे वाढवण्यात आले आहेत.
याचबरोबर सुरतजवळील उधना ते मंगळूर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीला दिनांक 19 नोव्हेंबर 2023 व 20 नोव्हेंबर 2023 च्या फेरीसाठी स्लीपर दर्जाचे दोन अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गावर सध्या पर्यटन हंगाम सुरू झाल्यामुळे तसेच ख्रिसमसचा कालावधी असल्याने वाढती गर्दी रोखण्यासाठी रेल्वेने सध्या धावत असलेल्या गाड्यांना डबे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.