सांगली : मिरज ते बंगळूरू दरम्यान धावणारी राणी चेन्नम्मा एक्सप्रेस दि १३ मार्च २०२४ पासून सांगली स्थानकावरून सुटणार आहे. या गाडीला सांगलीचे खासदार संजय काका पाटील उद्या दुपारी 3 वा. हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
याचबरोबर दिनांक 16 मार्चपासून गाडी क्रमांक 11027 /11028 दादर ते पंढरपूर ही गाडी पुढे मिरज मार्गे साताऱ्यापर्यंत दिनांक सुरू होत आहे. ही गाडी दुपारी 3.20 वा. साताऱ्याहून सुटून मिरज सांगोला पंढरपूर मार्गे दादरला जाईल यामुळे या भागातील प्रवाशांची सोय होणार असून मुंबई येथे जाण्यासाठी आणखीन एक गाडी उपलब्ध होत आहे. ही गाडी आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार मंगळवार व शनिवार या दिवशी दादरकडे जाईल. रविवार सोमवार आणि शुक्रवार दादर येथून सुटेल.
या नवीन सुरू होणाऱ्या रेल्वे सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार संजय काका पाटील, रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष मकरंद देशपांडे, सुकुमार पाटील मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य, गजेंद्र कल्लोळी उपाध्यक्ष व रेल्वे कृती समितीच्या सर्व सदस्यांनी केले आहे.