- ‘विस्टाडोम’मुळे रेल्वेच्या तिजोरीत कोट्यवधींचा महसूल
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या मुंबई सीएसटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस (12051/12052) तसेच मुंबई सीएसटी – मडगाव (22119/22120) तेजस एक्स्प्रेसला जोडण्यात आलेले पर्यटनपूरक पारदर्शक हायटेक विस्टाडोम कोच रेल्वेच्या तिजोरीत चांगलीच भर घालत असल्याचे निदर्शनास आले आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कोकणातून धावणार्या तेजस एक्स्प्रेसच्या विस्टाडोम कोचला 7.68 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. हे उत्पन्न मध्य रेल्वेला विस्टाडोममुळे मिळालेले सर्वाधिक उत्पन्न आहे.
याचबरोबर जनशताब्दी एक्स्प्रेसला जोडलल्या विस्टाडोम कोचमुळे 6 कोटी 16 लाखांचे उत्पन्न मिळाले. 2018 मध्ये पहिल्यांदाच मुंबई -मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला विस्टा डोम कोच जोडण्यात आला.