https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

मध्य रेल्वेवरून कोकण रेल्वे मार्गावर जाण्यासाठी भलीमोठी प्रतीक्षा यादी

0 9,267
  • चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडीसाठी नवीन कायमस्वरूपी गाड्या सोडण्याची गरज

रत्नागिरी :  मध्य रेल्वेवरील मुंबई, पुणे आणि नागपूर स्थानकांवरून कोकण रेल्वेकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये दि. १ एप्रिल, २०२३ ते १५ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत  एकूण ४,७३,९४८ प्रवासी चार्ट तयार झाल्यानंतर प्रतीक्षा यादीत राहिले, म्हणजे एवढ्या प्रवाशांना आरक्षण मिळू शकले नाही. याच कालावधीत २७,७६,६७७ प्रवाशांनी अनारक्षित (जनरल) तिकिटे काढली. एका दिवसाला सरासरी १४९० प्रवासी प्रतीक्षा यादीत राहिले तर ८७३१ इतके प्रतिदिन सरासरी अनारक्षित प्रवासी होते. 

कोकण रेल्वे मार्गावरील मोठी प्रतीक्षा यादी असलेल्या गाड्यांमध्ये पुढील गाड्यांचा समावेश आहे  :

  • ११००३ दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस
  • ११०९९ एलटीटी मडगाव एक्सप्रेस
  • २२११५ एलटीटी करमळी एक्सप्रेस
  • १२०५१ मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस
  • २२२२९ मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस
  • २२११९ मुंबई मडगाव तेजस एक्सप्रेस
  • ०११३९ नागपूर मडगाव एक्सप्रेस
  • १०१०५ दिवा सावंतवाडी एक्सप्रेस
  • १०१०३ मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेस
  • १६३४५ एलटीटी तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस
  • १२६१९ एलटीटी मंगळुरु मत्स्यगंधा एक्सप्रेस
  • १२२०१ एलटीटी कोचुवेली गरीब रथ एक्सप्रेस
  • २२११३ एलटीटी कोचुवेली एक्सप्रेस
  • २२६२९ दादर तिरुनेलवेली एक्सप्रेस
  • १२२२३ एलटीटी एर्नाकुलम एक्सप्रेस
  • २२१५० पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस
  • १२१३३ मुंबई मंगळुरु एक्सप्रेस
  • २०१११ मुंबई मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस.

एकूणच प्रतिदिन प्रतीक्षा यादी आणि अनारक्षित प्रवाशांची संख्या पाहता चिपळूण, रत्नागिरी आणि सावंतवाडीसाठी वाढीव गाड्यांची गरज अधोरेखित होते. तरी, रेल्वे प्रशासनाने आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, पुणे, नागपूर येथून वाढीव गाड्या कायमस्वरूपी सोडून या गर्दीवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी रेल्वेकडे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.