रत्नागिरी : गुजरातमधील पोरबंदर ते केरळमधील कोचुवेली या कोकण रेल्वे मार्गे धावणार्या लांब पल्ल्याच्या साप्ताहिक एक्सप्रेसला स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार पोरबंदर ते कोचुवेली (20910) या फेरीसाठी दि. 14 मार्च रोजी तर कोचुवेली ते पोरबंदर (20909) या मार्गावर धावताना रविवार दि. 17 मार्च 2024 रोजीच्या फेरीकरिता स्लीपर श्रेणीचा जादा डबा जोडण्यात येणार आहे.
- हे देखील वाचा : Konkan Railway | चिपळूण-पनवेल, पनवेल-रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारीपासून
- Konkan Railway | खेड रेल्वे स्थानकातून लवकरच होणार कंटेनर वाहतूक
- मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
कोकण रेल्वे मार्गे धावणार्या गाड्यांना उन्हाळी हंगामामुळे गर्दी झाल्याने या मार्गे धावणार्या नियमित गाड्या जादा डबे जोडून प्रतीक्षा यादीवर तिकिटे असलेल्या प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न रेल्वेने केला आहे.