https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

Konkan Railway | गरीबरथ एक्सप्रेस उद्यापासून होणार ‘एलएचबी’

0 21,740

कोचुवेलीहून मडगाव-रत्नागिरी मार्गे जाते लो. टिळक टर्मिनसला

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या आणखी एका एक्सप्रेस गाडीचे रुपडे पालटणार आहे. आतापर्यंत जुन्या रेकसह धावत असलेली गरीबरथ एक्सप्रेस (12202 / 12201)  ही आणखी एक गाडी दि. 23 जूनच्या फेरीपासून आत्याधुनिक एलएचबी रेकसह धावणार आहे.

भारतीय रेल्वेच्या विविध मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांचे जुने रेक बदलून त्याऐवजी नव्या श्रेणीतील एल एच बी रेकसह गाड्या चालवण्याचे धोरण रेल्वेने स्वीकारले आहे. त्यानुसार नवीन गाड्यांच्या उपलब्धतेनुसार एल एच बी गाड्या चालवण्यात येत आहेत. रेल्वेच्या या धोरणानुसार कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अनेक गाड्या देखील जर्मन तंत्रज्ञानाने बनवलेल्या एल एच बी रेकसह चालवल्या जात आहेत. आता त्यामध्ये केरळमधील कोचुवेली ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या गरीबरथ एक्सप्रेसला (12202/12201) कोचुवेली येथून सुटणाऱ्या फेरीसाठी दि. 23 जून 2024पासून तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली मार्गावर धावताना दिनांक 24 जून 2024 च्या फेरीपासून एल एच बी  रेक उपलब्ध केला जाणार आहे.

पंधरा डब्यांची गरीबरथ एक्सप्रेस होणार 22 डब्यांची!

नव्या कोच रचनेनुसार कोकण रेल्वे मार्गे धावणारी गरीबरथ एक्सप्रेस पूर्वीच्या पंधरा डब्यांच्या ऐवजी आता एलएचबी स्वरूपात धावू लागल्यानंतर 22 डब्यांची होणार आहे.

या स्थानकांवर थांबते गरीबरथ एक्सप्रेस

कोकण रेल्वे मार्गावर आल्यानंतर ही गाडी उडपी, मुकाम्बिका रोड, अंकोला, कारवार, मडगाव, रत्नागिरी हे थांबे घेत पुढे पनवेल ठाणे या स्थानकांवर थांबे घेऊन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसला तिचा प्रवास संपतो.

Leave A Reply

Your email address will not be published.