https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गे उद्या सकाळी धावणार चंदीगडसाठी स्पेशल ट्रेन!

0 340
  • मडगाव ते चंदिगड वन-वे स्पेशल उद्या सकाळी ९ वाजता मडगाव येथून सुटणार !
  • वातानुकूलित, स्लीपरसह जनरल डब्यांचाही समावे

रत्नागिरी : मडगाव ते चंदीगड अशी वन-वे स्पेशल ट्रेन उद्या दिनांक 12 जुलै 2024 रोजी सकाळी नऊ वाजता सुटणार आहे. रत्नागिरी, रोहा, पनवेल, वसई रोड मार्गे ही गाडी चंडीगडपर्यंत धावणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार मडगाव जंक्शन ते चंदीगड ही वनवे स्पेशल ट्रेन (02449) दिनांक 12 जुलै 2024 रोजी सकाळी नऊ वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल आणि चंदीगडला ती शनिवारी सायंकाळी सहा वाजून 25 मिनिटांनी पोहोचेल.

वन वे स्पेशलचे थांबे

करमळी, थिवी, पेडणे, रत्नागिरी, रोहा पनवेल, वसई रोड, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा, हजरत निजामुद्दीन, नवी दिल्ली, पानिपत आणि अंबाला कॅन्ट.

ही वनवे स्पेशल गाडी 22 डब्यांची एलएचबी श्रेणीतील धावणार आहे. यामध्ये वातानुकलीत श्रेणीसह स्लीपर व जनरल डब्यांचा ही समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.