Ultimate magazine theme for WordPress.

रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी मराठा, मराठा कुणबी ३६३ नोंदी

0 791

उपजिल्हाधिकारी (सा.प्र) शुभांगी साठे यांची माहिती

रत्नागिरी, दि. ६ : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कुणबी- मराठा, मराठा-कुणबी या 363, तर कुणबी 5 लाख 30 हजार 51 अशा एकूण 5 लाख 30 हजार 414 आतापर्यंत आढळलेल्या नोंदीची संख्या आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली.

03 नोव्हेंबर 2023 पासून विविध विभागांच्या कागदपत्रांच्या पडताळणीत सर्वात जास्त महसूल व जिल्हा परिषद विभागात या नोंदी आढळलेल्या आहेत.

कुणबी -मराठा, मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र निर्गमित करणेबाबत उपविभागीय अधिकारी यांचे कडून कार्यवाही सुरू आहे.
मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी 10 नोडल अधिकारी, 10 सहाय्यक नोडल अधिकारी, 4300 प्रगणक, 20 प्रशिक्षक आणि 271 पर्यवेक्षक यांच्यामार्फत 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2024 या कालावधीत 4 लाख 50 हजार 441 कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाबाबत 2 दिवस प्रशिक्षणही घेण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.