Madgaon Vande Bharat Express ‘मुंबई-मडगाव वंदे भारत’ च्या पहिल्याच फेरीबाबत महत्त्वाचे अपडेटस …. काय आहेत ही अपडेट्स?
कोकण मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस अवघ्या दोनच दिवसात हाऊसफुल्ल!
रत्नागिरी : आरक्षण खुले झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात कोकण रेल्वे मार्गावर आज शुभारंभ झालेली मुंबई सीएसएमटी -मडगाव (२२२२९) वंदे भारत एक्सप्रेस हाऊसफुल्ल झाली आहे. बुधवारच्या पहिल्या फेरीची सर्व तिकिटे आरक्षित झाल्याने आता या गाडीसाठी प्रतीक्षा यादीवरील बुकिंग सुरू झाले आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या आणि महाराष्ट्रातील पाचव्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. या गाडीची पहिली कमर्शियल फेरी दिनांक 28 जून 2023 रोजी होत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसच्या या पहिल्या फेरीची सर्वच्या सर्व तिकिटे आरक्षण खुले झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात संपली आहेत. यामुळे या गाडीसाठी आता वेटिंग लिस्ट वरील बुकिंग सुरू आहे. मडगावला उद्घाटन झालेली वंदे भारत एक्सप्रेस बुधवारी पहाटेच्या तिच्या नियमित फेऱ्यांसाठी मुंबई पोहोचते न पोचते तोच मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजताच तिची सगळी तिकिटे संपली. यामुळे कोणते भारत एक्सप्रेस उद्या बुधवारच्या पहिल्या फेरीची ची तिकिटे वेटिंग लिस्टवर बुक होऊ लागली आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला पॉझिटिव्ह ‘सिग्नल’
मेक इन इंडिया अंतर्गत बनवण्यात आलेल्या हायटेक वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट विमानापेक्षा महाग असल्याची ओरड एकीकडे होत असतानाच प्रत्यक्षात अवघ्या दोन दिवसात ही संपूर्ण गाडी आरक्षित झाल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेससाठी हा एक पॉझिटिव्ह सिग्नल मानला जात आहे.