श्री साई सेवा मंडळाच्या मानाच्या पालखीचे महेंद्रशेठ घरत व शुभांगीताई घरत यांच्या हस्ते पूजन
उरण (विठ्ठल ममताबादे ) : दरवर्षी प्रमाणे उरण तालुक्यातील श्री साई सेवा मंडळाची मानाची पालखी दिंडी सोहळा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. या पदयात्रेसाठी दरवर्षी आर्थिक मदत करणारे दानशूर व्यक्तिमत्व श्री. महेंद्रशेठ घरत व त्यांच्या सौभाग्यवती शुभांगीताई घरत यांना या मानाच्या पालखी पूजनाचा मान देण्यात आला.
महेंद्रशेठ घरत यांनी सपत्नीक यथासांग पालखीचे पूजन केल्यावर ही पालखी दिंडीने उरणहून शिर्डीकडे प्रस्थान केले. यावेळी उरण तालुक्यातील शेकडो पदयात्री उपस्थित होते.