‘मँगो सिटी’ रत्नागिरीत साकारणार मँगो पार्क !
रत्नागिरी : हापूस आंब्यासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी तालुक्यात आता निवेंडी परिसरात मँगो पार्क उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे. या माध्यमातून येथील आंबा प्रक्रिया उद्योगांना चालना मिळण्यास मदत होणार आहे.
१०० एकर क्षेत्रात होणार प्रकल्प
निवेंडी परिसरातील शंभर एकर क्षेत्रात मँगो पार्क साकारले जाणार आहे. यासाठी निवेंडी येथील 91.23 हेक्टर तर तळेकर वाडी येथील 7.56 अशी एकूण शंभर एकर जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. मॅंगो पार्कच्या उभारणीनंतर येथे आंब्यावरील प्रक्रिया उद्योग उभारणी करणे शक्य होणार आहे.
राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी परिसरात मॅंगो पार्क होऊ घातले आहे.