रत्नागिरी : मत्स्य महाविद्यालय, शिरगांव रत्नागिरी येथे राष्ट्रीय मत्स्य संवर्धक दिन (१० जुलै) साजरा करण्यात आला. मत्स्य महाविद्यालयाने चार दिवसांपूर्वीच कोळंबी बीज संचयन केलेल्या महाविद्यालयाच्या आवारातील संवर्धन तलावावर कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी मत्स्य महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि सद्या कोळंबी संवर्धन क्षेत्रात रत्नागिरी परिसरात कार्यरत असलेले कोळंबी संवर्धक सर्वश्री. भुपेंद्र परब, आकाश बंडागळे, अनिकेत निवदेकर, निलेश सावंत, आकाश नाचरे, संकेत हळदणकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. या सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत आणि त्यांच्या व्यावसायिक यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
हा कार्यक्रम मत्स्य महाविद्यालयाच्या मत्स्य संवर्धन व मत्स्य जलशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद सावंत यांनी केले. तर मत्स्य संवर्धन विभागप्रमुख डॉ. अनिल पावसे यांनी विद्यार्थ्यांना कोळंबी संवर्धनाबाबत शास्त्रीय माहिती दिली. मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुधाकर इंदुलकर यांनी मत्स्य संवर्धक दिनाचे महत्त्व विषद केले आणि विद्यार्थ्यांनी कोळंबी संवर्धन क्षेत्रात उतरून उद्योजक म्हणून आपली ओळख निर्माण करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गजानन घोडे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. भास्कर भोसले, डॉ. राजू तिबिले, डॉ. वर्षा भाटकर-शिवलकर, डॉ. संगीता वासावे, डॉ. सुहास वासावे, डॉ. संतोष मेतर, डॉ. संदेश पाटील, डॉ. अजय देसाई, श्री. साईप्रसाद सावंत, श्री. भालचंद्र नाईक, श्रीमती अपूर्वा सावंत, श्रीमती प्रज्वला सावंत, नितेश कांबळे, निखिल सावंत तसेच पीएचडी, पदव्युत्तर आणि पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.