आगामी सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरद्वारे घ्याव्यात करण्याची नवघर ग्रामपंचायतीची मागणी
- नवघर ग्रामसभेत बहुमताने एकमुखी ठराव पास
- ठराव पास करणारी नवघर ग्रामपंचायत ही उरण तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत
उरण दि २९ (विठ्ठल ममताबादे ) : आगामी येणाऱ्या सर्व सार्वत्रिक निवडणुका या ईव्हीएम मशीन ऐवजी मतदान पत्रिकान्वये घेण्यात यावा असे ठराव उरण तालुक्यात नवघर ग्रामपंचायत च्या ग्रामसभेत झाला आहे.विशेष म्हणजे ग्रामस्थांनी ही मागणी मोठ्या प्रमाणात केली आहे. हा ठराव सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी बहुमताने एक मतांनी पास केला आहे. सदर ठराव पास करणारी नवघर ग्रामपंचायत ही उरण मधील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
जगभरात असलेल्या लोकशाही स्वीकारलेल्या देशामध्ये ईव्हीएम मशिनचा वापर मतदानप्रक्रियेत केला जात नाही. जर्मनीसारख्या प्रगत देशातही ईव्हीएमविरोधात याचिकेची दखल घेत मतदान पत्रिकेनुसार मतदानप्रक्रिया सुरू करण्यात आली.मात्र भारतात तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्ष वगळता सर्वांनी ईव्हीएमद्वारे मतदान बंदची मागणी केली आहे.जेथे जेथे ईव्हीएम प्रणालीद्वारे निवडणुका घेतल्या गेल्या आहेत. तेथे नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. ईव्हीएमचा निकाल सदोष आहे. त्यामुळे निवडणुका ईव्हीएमद्वारे घेऊ नये, अशी जोरदार मागणी नवघर ग्रामपंचायतने केली आहे.सरपंच व उपसरपंच तसेच सर्व सदस्यांनी, ग्रामस्थांनी हा एकत्रित निर्णय घेतला आहे.
या प्रसंगी सरपंच सविता मढवी,उपसरपंच विश्वास तांडेल, माजी उपसरपंच दिनेश बंडा, ग्रामपंचायत सदस्य – प्रियदर्शनी म्हात्रे,अक्षरा जोशी,रंजना भोईर,श्रीमती उषा बंडा,नयना बंडा,कविता पाटील, संध्या पाटील,नम्रता पाटील, कुंदन कडू, प्राची पाटील, जयमाला पाटील,आरती चोगले, रत्नाकर चोगले, ग्रामविकास अधिकारी जी के म्हात्रे तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
- हे देखील वाचा : Konkan Railway | चिपळूण-पनवेल, पनवेल-रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारीपासून
- Konkan Railway | आंगणेवाडी यात्रेसाठी १ मार्चपासून विशेष गाड्या
ठराव पास झाल्यानंतर उपसरपंच विश्वास बळीराम तांडेल, रवींद्र सदानंद पाटील, नितीन लक्ष्मण मढवी, संतोष दामाजी पाटील, अमित अर्जुन जोशी तसेच शिवसेना शाखाप्रमुख अविनाश एकनाथ म्हात्रे यांनी उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांना येणाऱ्या आगामी सर्व निवडणुका इव्हीएमद्वारे न घेता बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी करत त्यांना निवेदन दिले आहे.