रत्नागिरी : माघी गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळे येथील मंदिरात भाविकांना श्रींच्या शृंगार स्वरूप दर्शनाची पर्वणी उपलब्ध झाली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील समुद्रकिनारी रमणीय परिसरात असलेल्या स्वयंभू श्रींच्या मंदिरात माघी गणेशोत्सवानिमित्त गाभाऱ्यात आकर्षक आरास करण्यात आली आहे. मंदिराचे मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर तसेच सहकाऱ्यांनी बाप्पाचा गाभारा सुंदररित्या सजवण्यात आला आहे.
या उत्सवाचे औचित्य साधून दूरवरून आलेल्या भाविकांनी श्रींचे मनोभावे दर्शन घेतले.