https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

मुंबई-गोवा महामार्गाची एक लेन डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल

0 50

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची लांजा येथे ग्वाही

लांजा : डिसेंबर २०२३ पर्यंत मुंबई गोवा महामार्गाची एक लेन पूर्ण होईल अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी लांजा येथे पत्रकारांशी बोलताना दिली. मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे कोकण दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी ३० मे रोजी सिंधुदुर्गकडून रत्नागिरीकडे परतत असताना ते लांजा शहरातील कोत्रे हॉटेल समोर काही काळ थांबले होते. यावेळी लांजा भाजपाच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.


यावेळी पत्रकारांनी मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की डिसेंबर २०२३ पर्यंत महामार्गाच्या एक लेनचे काम पूर्णत्वास जाईल. त्याचप्रमाणे महामार्गावर ज्या ज्या ठिकाणी ब्रिज आहेत. त्यांची कामे तेथील परिस्थितीतील या ब्रिजची कामे लवकरच पूर्णत्वास जातील, असे त्यांनी सांगितले. याबरोबरच भाजपा पदाधिकाऱ्यांनी सर्व्हिस रोडचे काम देखील पूर्ण करण्याची मागणी केली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रांत कार्यालयाचे अधिकाऱ्यांना याबाबत हे काम तातडीने मार्गी लावा अशा सूचना केल्या.


लांजा येथे मंत्री रवींद्र चव्हाण यांचे स्वागत करताना भाजपाचे तालुकाध्यक्ष महेश खामकर, तालुका सरचिटणीस विराज हरमले तसेच नगरसेवक संजय यादव, मंगेश लांजेकर, शितल सावंत, ज्येष्ठ पदाधिकारी विजय कुरूप तसेच आत्माराम धुमक, शेखर सावंत,भरत कोळवणक आदींसह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.