https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

अंगणी आमुच्या ‘ब्ल्यु मॉरमॉन’ प्रगटले!

0 67

चिपळूण : वर्षभर आढळणारे पण पावसाळा आणि त्यानंतरच्या काळात शहरातील आमच्या खेण्ड (चिपळूण, जि. रत्नागिरी) येथील विधिलिखित निवासस्थानी परसबागेला दरवर्षी भेट देणारे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ‘ब्ल्यू मॉरमॉन’ने (Blue Mormon butterfly) आज (दि. ३) छान दर्शन दिले.

सध्याच्या सकाळच्या हलक्या थंडीच्या वातावरणात, तांबड्या जास्वंदीच्या एका कोवळ्या फांदीवर हे निवांत बसलेले आढळले. गेले काही दिवस त्याचे दर्शन घडत असताना आज मात्र छायाचित्र टिपता आले. फुलपाखरांच्या आकाराचा विचार केला तर सदर्न बर्डविंगनंतर ब्ल्यू मॉरमॉन फुलपाखरू दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे फुलपाखरू मखमली काळ्या रंगाचे असून त्याच्या पंखावर निळ्या रंगाच्या आकर्षक खुणा असतात. त्याचबरोबर शरीराकडील एका बाजूला लाल ठिपका आढळतो.

या फुलपाखराची उडण्याची पद्धत राजेशाही असते. अतिशय देखणे दिसणार्‍या या फुलपाखराचे अस्तित्व समृद्ध निसर्गाचे-जंगलाचे निदर्शक मानले जाते.

– धीरज वाटेकर

Leave A Reply

Your email address will not be published.