फार्मासिस्ट मनोज ठाकूर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
उरण दि २ (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलच्या (MSPC) वतीने “उत्कृष्ट जागतिक औषधनिर्माता दिन” साजरा करणारे फार्मासिस्ट तसेच संस्था, संघटना यांच्या मधून पहिल्यांदाच देण्यात येणारा “राज्यस्तरीय विशेष सन्मानाचे मानकरी “म्हणून मुंबई,कोकण विभागातुन राज्यस्तरीय उत्कृष्ट फार्मासिस्ट मुंबई कोकणविभाग (वैयक्तिक) या विशेष सन्मानाचे पहिले मानकरी म्हणून “फार्मासिस्ट मनोज ठाकुर”, ता-उरण जि. रायगड यांचा MSPC चे अध्यक्ष मा. अतूलजी आहिरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.
या वेळी आमदार आप्पासाहेब शिंदे(अध्यक्ष, MSCDA & AICOD व PCI चे कार्यकारिणी सदस्य ), उपाध्यक्ष धनंजयजी जोशी, सोनालीताई पडोळे, नितिनजी मनियार, मनोहरजी कोरे , रजिस्ट्रार सायली मसाळ उपस्थित होते.
जागतिक फार्मसिस्ट दिना निमित्त सामाजिक आणि फार्मसी क्षेत्रा मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विभूतींचा तसेच संस्थांचा सत्कार या वर्षी पासून महाराष्ट्र शासनाच्या ,महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल ने आयोजित केले आहे.वैयक्तिक पातळीवरचा राज्यस्तरीय मुंबई, कोकण विभागातून पहिला पुरस्कार फार्मसिस्ट मनोज जगन्नाथ ठाकूर (प्रोप्रा.ओम साई मेडिकल उरण,रायगड)यांचा ते करत असलेल्या कार्याची दखल घेऊन करण्यात आला. मागील १८ वर्षे मनोज ठाकूर हे वनवासी कल्याण आश्रमाचे उरणचे अध्यक्ष म्हणून आदिवासी क्षेत्रात काम पाहत आहेत.
उरण तालुका केमिस्ट असो. माजी अध्यक्ष तसेच विद्यमान रायगड जिल्हा केमिस्ट असो चे संचालक(ऑफिस बेरर) म्हणून कार्यरत आहेत.रोटरी क्लब ऑफ उरण चे ते माजी अध्यक्ष आहेत.त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.दोन्ही राज्यस्तरीय,मुंबई कोकण विभागीय पुरस्कार रायगड ला मिळत असल्यामुळे रायगड जिलल्ह्यातील केमिस्ट बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.