https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

अंगणवाडीसाठी निघाली भरती!

0 192

अंगणवाडी मदतनीस पदासाठी २३ आॕगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


रत्नागिरी, दि.9 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी 1 मार्फत अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे भरावयाची आहेत. इच्छूक स्त्री स्थानिक उमेदवारानी 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना रत्नागिरी १, साईप्रसाद बिल्डींग पहीला मजला, एकता मार्ग, नाना नानी पार्कजवळ, स्मॉल वंडर्स शेजारी, मारुती मंदिर ता.जि.रत्नागिरी येथे अर्ज करावेत, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी 1 यांनी केले आहे.


ग्रामपंचायत गावखडीमध्ये गावखडी बौध्दवाडी आणि गावखडी नानरकरवाडी अंगणवाडी केंद्र, मेर्वी ग्रामपंचायतीमध्ये मेर्वी जांभुळआड, पावस ग्रामपंचायतीमध्ये पावस मोहल्ला, कोळंबे मध्ये कोळंबे क्र.5 अंगणवाडी केंद्र, फणसोप ग्रामपंचायतीमध्ये फणसोप टाकळेवाडी आणि फणसोप सडा अंगणवाडी केंद्र, तोणदे ग्रामपंचायतीमध्ये बागपाटोळे अंगणवाडी केंद्र, हरचेरी ग्रामपंचायतीमध्ये घवाळीवाडी, आहिल्यानगर ग्रामपंचायत, नाखरे ग्रामपंचायतीत नाखरे नं.१, नाखरे कालकरकोंड आणि नाखरे धनगरवाडा, चांदोर ग्रामपंचायतीमध्ये चांदोर मधळीवाडी, चांदोर दोनआंबा अंगणवाडी केंद्र, गोळप ग्रामपंचायतीत गोळप मोहल्ला 2 अंगणवाडी केंद्र, कुरतडे ग्रामपंचायतीत कातळवडी आणि बौध्दवाडी अंगणवाडी केंद्र, पोमेंडी बुद्रुक येथे बाणेवाडी आणि आदर्श वसाहत अंगणवाडी केंद्र,चिंद्रवली ग्रामपंचायतमध्ये कांबळेवाडी अंगणवाडी केंद्र, टिके ग्रामपंचायतीत चाळकेवाडी अंगणवाडी केंद्र, खानू ग्रामपंचायतीमध्ये नाणीज सरफरेवाडी, वेळवंड कोंडवाडी अंगणवाडी केंद्र, शिरगाव ग्रामपंचायतमध्ये शिरगाव मयेकरवाडी, केळ्ये येथे केळ्ये मुस्लिमवाडी अंगणवाडी केंद्र, हातखंबा ग्रामपंचायतीमध्ये हातखंबा बोंबलेवाडी आण हातखंबा बौध्दवाडी, पानवल गा्रमपंचायतीध्ये पानवल जुगाईनगर अंगणवाडी केंद्र, निवळी ग्रामपंचायतीमध्ये निवळी गावडेवाडी आणि निवळी कोकजेवठार अंगणवाडी केंद्र या ठिकाणी पदे भरावयाची आहेत.


शैक्षणिक पात्रता : अंगणवाडी मदतनीस पदासाठी इयत्ता 12 वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील. (गुणपत्रक आवश्यक)
वास्तव्याची अट : ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तरन महसुली गाव/वाडी/वस्ती/पाडे मधील रहिवासी असणे आवश्यक आहे.
वयाची अट : अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस पदावर सरळ नियुक्तीसाठी (By Nomination) वयोमर्यादा किमान १८ व कमाल ३५ वर्षे अशी राहिल. तथापि, विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमाल ४० अशी राहिल.
विधवा/अनाथ असलेबाबत दाखला (असल्यास दाखला), लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात अपत्ये, जातीचा दाखला असल्यास आवश्यक, अंगणवाडी मदतनीस म्हणून कमीत कमी २ वर्षांचा अनुभव असल्यास दाखला आवश्यक, शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र आवश्यक (MSCIT).
आवश्यक माहितीसाठी सुटटीचे दिवस वगळून इतर कार्यालयीन दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत संपर्क साधावा. नमुन्यातील परिपूर्ण अर्ज स्विकारले जातील. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार
केला जाणार नाही व अपूर्ण अर्जाबाबत पत्रव्यवहार केला जाणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.