https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

रत्नागिरीच्या एस. आर. के. तायक्वांदो क्लबच्या खेळाडूंचे राज्यस्तरीय विद्यापीठीय तायक्वांदो स्पर्धेत वर्चस्व

0 116

रत्नागिरी :  मुंबई विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन गुरुनानक खालसा कॉलेज यांनी 9 ते 11 ऑक्टोबर रोजी जी एन खालसा कॉलेज माटुंगा येथे केलं होत. या स्पर्धेत रत्नागिरी मारुती मंदिर येथील एस. आर. के. तायक्वांदो क्लबच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. संघाचे प्रतिनिधित्व करत श्रुती रामचंद्र चव्हाण हिने सुवर्णपदक पटकावले. संघातील वेदांत सूरज चव्हाण, सुजल रणजीत सोळंके, समर्था सतीश बने, यश सूरज चव्हाण, सई संदेश सावंत, पार्थ विनायक गावडे यांनी कांस्यपदकाची कमाई केली.

आंतरमहावद्यालयीन स्पर्धेत सहभागी आणि यशस्वी झालेले खेळाडू आणि क्रीडा प्रशिक्षक सांघिक चषक स्वीकारताना.


एक सुवर्ण आणि सहा कांस्यपदकाच्या एकूण गुणांच्या कमाईने या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी यांनी द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या श्रुती चव्हाण हिची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


या खेळाडूंना तायक्वांदो प्रशिक्षक शाहरुख शेख यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या स्पर्धेकरीत यशस्वी झालेल्या या सर्व खेळाडूंचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार व्यंकटेशराव कररा, गोगटे कॉलेजचे क्रीडा प्रमुख विनोद शिंदे, क्रीडा शिक्षक कल्पेश बोटक, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तायक्वांदो प्रशिक्षक प्रशांत मकवाना, मिलिंद भागवत,
क्लबचे उपाध्यक्ष अमोल सावंत, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य वीरेश मयेकर, निखिल सावंत, कांचन काळे यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.