https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

रत्नागिरीच्या श्री देव भैरी देवस्थानची नियोजनासाठी शिमगोत्सव सभा

0 421


रत्नागिरी : सालाबादप्रमाणे रविवार दि. 24-03-2024पासून सुरु होणा-या श्रीदेव भैरी देवस्थानचा शिमगा उत्सवाचा कार्यक्रम ठरविण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.10/03/2024 रोजी सकाळी 10.00 वा. श्रीदेव भैरी मंदिरामध्ये घेण्यात आली. या सभेस बारा वाडयातील सर्व मानकरी, गावकरी, ट्रस्टी, गुरव मंडळी व ग्रामस्थ बंधु उपस्थित होते.

प्रथेप्रमाणे सुरुवातीला दिंवगत व्यक्तीना श्रध्दांजली अर्पण करुन सभेस सुरुवात झाली. शिक्षण महर्षी कै. एन.व्ही. तथा अरुअप्पा जोशी गुणवंत विद्यार्थी पारितोषिक रत्नागिरी एयुकेशन सोसायटीची पी.जी. अभ्यंकर युनियर कॉलेजची विद्यार्थीनी कु. कुलकर्णी गौरी महेंद्र हिला स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम रु. 5000/- (पाच हजार रु) देवून सत्कार करण्यात आले. त्यांनतर दि. 24/03/2024 पासून होणा-या शिमगा उत्सवाची रुपरेषा पुढीलप्रमाणे ठरविण्यात आली.


शिमगा उत्सव कार्यक्रम


रविवार दि. 24/03/2024 (फाल्गुन पौर्णिमा)
रोजी रात्रौ 10 वा. सहाणेवरुन श्रीदेव भैरीला उत्सवाचे निमंत्रण म्हणून गावकरी, मानकरी, ट्रस्टी, गुरव मंडळी व ग्रामस्थ मंडळी पारंपारिक पध्दतीत झाडगांव सहाणेवरुन महालक्ष्मी शेतातून श्रीदेव भैरी मंदिरात रात्रो ठिक 11 वाजेपर्यत जातील. मध्यरात्री 12 वाजता श्रीदेव भैरीची पालखी श्रीदेवी जोगेश्‍वरी भेटीसाठी, ग्राम प्रदक्षिणा व जोगेश्‍वरीची होळी उभी करण्यासाठी श्रीदेव भैरी मंदीरा बाहेर पडेल व खालची आळी, कै. बाळोबा सावंत यांच्या आगरातून महालक्ष्मी शेतातून मध्यरात्रीनंतर 1.30 वाजेपर्यत श्रीदेवी जोगेश्‍वरी मंदिरात जाईल.
सोमवार दि. 25/03/2024
श्रीदेवी जोगेश्‍वरी मंदिरात मुरुगवाडीतील मंडळी आल्यानंतर पहाटे 3 वाजता श्रीदेवी जोगेश्‍वरी मंदिरातून पालखी ग्रामप्रदक्षिणा व होळीचा शेंडा उभा करण्यासाठी बाहेर पडून झाडगांव सहाणेवरुन झाडगांव नाका, टिळक आळी, कॉग्रेंस भूवन ,मुर्लीधर मंदीर, बंदर रोड मार्गे पहाटे 5 वाजता मांडवी भडंग नाका येथे जाईल. तेथून पुढे प्रत्येकी एक-एक तास याप्रमाणे मांडवी, घुडेवठार , विलणकरवाडी,चंवडे वठार,खडपे वठार मागील समुद्र मार्गाने जावून पुढे शेटये यांचे घराजवळ रस्त्यावर येवून खडपेवठारातून गोडीबाव तळयावर सकाळी 10 वाजता येईल. तेथून तेली आळी भागातून , राम नाका ,राम मंदिर येथे सकाळी 11.30 वाजता येईल तेथून पुढे बारा वाडयांच्या वतीने राधाकृष्ण नाका, गोखले नाका येथे दुपारी 12 वाजता येईल तेथून पुढे गोखले नाक्यावरुन हॉटेल प्रभा समोरुन टिळक आळी गणपती मंदिराजवळून श्रीदेवी जोगेश्‍वरी मंदिराजवळ श्री. चंद्रकांत गुरव यांच्या कंपाऊंडमध्ये होळीचा शेंडा घेण्यासाठी जाईल. तेथून होळीचा शेंडा घेऊन दुपारी 3 वाजेपर्यत झाडगाव येथे सहाणेवर जावून तेथे होळी उभी केली जाईल.
सोमवार दि. 25/03/2024
रात्रौ 9 वाजता धुळवड साजरी करण्यासाठी श्रीदेव भैरीची निशाण सहाणेवरुन निघेल व सांवतखोत वठारातून पटवर्धन यांच्या घरापर्यंत जावून फिरुन येईल व देवस्थानचे मुख्य खोत श्री रमाकांत गोपाळसांवत व श्री संतोंष आत्माराम सांवत यांच्या घरी जाईल तेथे पुजा अर्चा होऊन धुळवड श्रीदेवी
जोगेश्‍वरी मंदीरात जाईल तेथून सहाणेच्या मागील बाजूने झाडगावकर (दिवटीवाले मानकरी) यांच्या कंपाऊड मध्ये जाऊन सुर्वे यांच्या बागेतून शिवलकर वगैरे यांच्या घराजवळून कुभांरवाडयातून परटवणे फगरवठार येथून परत फिरुन निशाण वरच्या आळीतून , लक्ष्मी चौक, गोखले नाक्यातून ढमालनिच्या पारावर येईल सुमारे रात्रो 11.30 वा. ढमालनीच्या पारावरुन निशाणाचे तीन भाग होतील त्यापैकी एक भाग निशाण घेवून गुरव मंडळी श्रीदेव भैरी मंदिरामध्ये जातील. दुसरा भाग गोखले नाक्यावरुन राधाकृष्ण नाक्यावरुन मासळी बाजारापेठ येथे जाईल , तेथे रवी सुर्वे , मयेकर यांचे घराच्या दरम्यान फिरुन मच्छी मार्केटच्या मागील बाजूने झारणी रोड मार्गे राम नाक्यावरुन तेली आळीत रसाळ यांचे घरी तिटयावरती येईल. ढमालणीच्या पारावरुन तिसरा भाग निघून प-याची आळी , मारुती आळीतून तेली आळी येथील श्री रसाळ यांचे घरी तिटयावर येईल. तेथून गोडीबाव नाक्यावरुन श्री देसाई यांचे घरी जावून, खडपेवठार येथे श्री देसाई व श्री. विलणकर यांचे शेतातून कै. रघू विलणकर यांचे घरी जाईल तेथून निशाण राजिवडा येथील श्रीदेव विश्‍वेश्‍वर मंदिरात जाईल (सुमारे 1.30वा.) तेथे श्रीदेव विश्‍वेश्‍वराच्या हद्दीत फिरुन श्रीदेव विश्‍वेश्‍वराच्या मंदिरामध्ये गा-हाणे होईल व निशान बाहेर पडेल . तेथून राजीवडयातील चव्हाण यांच्या घराशेजारी जाईल. तेथे मुस्लीम मानकरी श्री काद्री यांना देवस्थानकडून श्रीफळ देवून गळाभेट होईल व तेथे धुळवड साजरी होईल. तेथून निशाण परत फिरुन खडपेवठार सतीजवळून, चंवडे वठार नाक्यावरुन,विलणकरवाडी,श्री.दत्त मंदिर नाका, घुडे वठार,मांडवी येथे श्री. वारंग यांचे घरी रात्री थांबेल.
मंगळवार दि. 26/03/2024
सकाळी 8 वाजता मांडवी वारंग यांचे घरापासून पुढे चौगुलेवाडी समुद्रमार्गे पौडा वरुन कुरणवाडी, सिध्देश्‍वर विरेश्‍वर चव्हाटयाजवळ गा-हाणे होईल. तेथून धुळवड श्री आबूंलकर यांच्या घरी जाईल. आंबूलकर यांच्या घरातून सांबमंदिर,जोतीबा मंदिर येथे धुळवडीचे दोन भाग होवून एक भाग राममंदिरच्या मागील बाजूने जावून दुसरा भाग राममंदिराच्या पुढिल बाजूने मिरकरवाडा पोलिस चौकीजवळ धुळवडीचे दोन भाग एकत्र येवून तेथून पुढे भैरी मंदिर , सुभेदार यांच्या घराजवळून श्री विलास पिलणकर यांच्या फिशरीज फॅक्टरी जवळून विठलादेवी जवळून ग्रामस्थ श्री. शिरधनकर यांच्या घरी जाईल. तेथून मुरुगवाडा घसरवाटेजवळ धुळवडीचे दोन भाग होतील. एक भाग झाडगाव येथील झाडगावकरांच्या कंपाऊंडमध्ये येईल व दुसरा भाग तेथून पुढे पंधरा माड येथील श्री. पिलणकर यांच्या घरी जाईल. नंतर मुरुगवाडा हद्दीजवळ जावून तेथे गा-हाणे होवून धुळवड परत मागे फिरुन झाडगांव सहाणेजवळील झाडगावकर (दिवटीवाले मानकरी) यांच्या कंपाऊड मध्ये दुपारी 12 वाजता येईल व धुळवडीचा कार्यक्रम संपेल.
बुधवार दि. 27/03/2024 ते 29/03/2024 दुपारी 12 वाजेपर्यंत श्रीदेव भैरी ची पालखी झाडगांव सहाणेवर भाविकांच्या दर्शनासाठी स्थानापन्न असेल.
तसेच दि.27/03/2024 ते 29/03/2024 च्या रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत प्रत्येक वाडी तर्फे पारंपारिक पध्दतीत पालखी नाचविण्याचा कार्यक्रम होईल.
शक्रवार दि. 29.03.2024
रोजी दु. 12.00 वा. श्रीदेव भैरीची पालखी मुरुगवाडयात ग्रामप्रदक्षिणेसाठी सहाणेवरुन उठेल व झाडगाव मार्गे, श्रीदेवी जोगेश्‍वरी मंदिर येथून खालची आळी, भैरी मंदिर मार्गे दांडाफॅक्टरीचे मागिल बाजूने मुरुगवाडयातून पंधरा माडापर्यंत जावून परत मागे फिरेल व रात्रौ साधारण 10.00 वाजता झाडगाव सहाणेेवर येईल, त्यानंतर सहाणेवर रात्री पालखी नाचविण्याचा कार्यक्रम होईल.
शनिवार दि.30.03.2024 (फाल्गून पंचमी ) (रंगपंचमी)
श्रीदेव भैरी ची पालखी रंग खेळण्यासाठी दुपारी 1 वाजता सहाणेवरुन उठेल व पोलिस कर्मचा-यांची शस्त्र सलामी घेवून वरच्या खोत वठारातून झाडगाव श्रीदेवी जोगेश्‍वरी मंदिरातून खेडसकर सांवत कंपाऊड मधून सहाणेच्या मागील बाजूने झाडगाव नाक्यावरुन खालच्या खोत वठारातून 3.00 वाजता झाडगाव नाक्यावर येईल तेथून पुढे गाडीतळ येथे 4.00 वाजेपर्यत येईल, पुढे श्रीदेवी नवलाई पावणाई मंदिरात सांय.5.00 वाजता पोहचेल. तेथून पुढे शहर पोलीस स्टेशनला पोहचेल, पुढे धनजी नाकयावरुन , राधाकृष्ण नाकयावर सांय.06.30 वा. येईल. पुढे राम नाका, राम मंदिर येथे सांय 07 वा. येईल, पुढे मारुती आळी, गोखले नाकयावरुन, ढमालनीच्या पारावर रात्रौ 9 वाजता पालखी येईल. तेथून पुढे विठठल मंदिर, हॉटेल प्रभा, कॉग्रेस भूवन, मुरलीधर मंदिर येथे रात्रौ 10 वाजता पालखी येईल, पुढे खालची आळी मार्गे पालखी श्रीदेव भैरी मंदिराच्या प्रागंणात रात्रौ 11.30 वाजेपर्यत येईल. रात्रौ 12 वाजता पालखी श्रीदेव भैरी मंदिरात स्थानापन्न होईल, नंतर धुपारत व गावाचे गार्‍हाणे होवून शिमगा उत्सवाची सांगता होईल.

यांनतर सर्वाचे आभार मानून शिमगा उत्सव आंनदाने, शांततेने व कै. अरुअप्पांनी घालून दिलेल्या शिस्तबध्द पध्दतीनेच उत्साहाने व वेळेवर साजरा करुया असे आवाहन करुन गा-हाणे घेऊन सभा संपलयांचे जाहिर केले.

Leave A Reply

Your email address will not be published.