https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

उरण आदिवासीवाडीत महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी

0 94

उरण (विठ्ठल ममताबादे ) : ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक ९ मार्च २०२४ रोजी डीव्हाईं फॉउंडेशन सिवूड नेरूळ, वनवासी कल्याण आश्रम उरण आणि डॉ. डी वांय पाटील हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने विंधनें आदिवासीवाडी उरण येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.वाडीवरील ११९ रुग्णांनी याचा लाभ घेतला.

या शिबिरासाठी डॉ अंकिता,आणि डॉ.वृत्ती स्त्रीरोगतज्ज्ञ , डॉ.धृत, डॉ.हर्षवर्धन हे बालरोगतज्ञ डॉ.व्यंकट एमडी मेडीसिन यांनी आपली सेवा दिली.२४ आदिवासी बांधवांचे इ सी जी देखील तेथे काढण्यात आले.आणि ५० बांधवांचे मधुमेह  तसेच रक्त तपासणी करण्यात आली.ज्या रुग्णांना पुढील उपचारांची आवश्यकता आहे त्यांना डी वय पाटील हॉस्पिटल नेरूळ येथे मोफत उपचार देण्यात येतील आणि त्यासाठी जमल्यास नेण्याची व्यवस्था हॉस्पिटल करेल असे समन्वयक  राजेश डोके यांनी सांगितले.

सर्व रुग्णांना डोस प्रमाणे औषधे,प्रोटीन पावडर आणि सकस आहार म्हणून चणे आणि नाचनीचे पीठ  डीव्हाईं फॉउंडेशनचे अध्यक्ष डी एच सुब्रमण्यम, सुजाता रंगनाथन यांच्या तर्फे देण्यात आले.औषधे वाटपसाठी फा. हरेश जगदाळे, फा.बळीराम पेणकर आणि वनवासी कल्याण आश्रमचे अध्यक्ष फा.मनोज ठाकूर यांनी सहकार्य केले.

वनवासी कल्याण आश्रमाचे वामन म्हात्रे,सुनंदा वाघमारे, दीपक गोरे,डीव्हाईंन फोंडेशनचे विजय, चारुदत्त कोरे शाळेतील शिक्षक  राजेश चोगले , संदीप पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.