रत्नागिरी : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने दि. 25 ते 27 जुलै 2024 रोजी बीड जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा संकुल येथे राज्यस्तरीय ज्युनियर वजनी गटातील तायक्वांदो स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघाचा देखील समावेश आहे. या संघामध्ये रत्नागिरी तालुक्यातील युवा मार्शल तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर साळवी स्टॉप ओम साई मित्र मंडळ सभागृह येथे सुरू असलेल्या प्रशिक्षण केंद्रातील चार खेळाडूं साधना भावेश गमरे, सई संदेश सुवरे, हर्षदा अशोक मोहिते, व अमेय भरत पाटील यांची निवड राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी झाली आहे.
या यशस्वी खेळाडूंना रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन अध्यक्ष श्री. वेंकटेश्वरराव कररा उपाध्यक्ष श्री. शैलेश गायकवाड श्री. विश्वदास लोखंडे
सचिव श्री. लक्ष्मण कररा कोषाध्यक्ष श्री. शशांक घडशी, संजय सुर्वे व सर्व पदाधिकारी तसेच कै. अन्नपूर्णा प्रभू संगीत कला विद्यालयाचे अध्यक्ष अनंतजी आगाशे युवा मार्शल टायकोंडो ट्रेनिंग सेंटरचे सर्व पदाधिकारी पालक, प्रशिक्षक यांनी अभिनंदन केले.
सर्व यशस्वी खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक राम कररा, सहप्रशिक्षक सौ. शशिरेखा कररा, अमित जाधव प्रतीक पवार यांचे मार्गदर्शन लाभले