चिपळूणच्या युनायटेड गुरुकुलचे राज्यस्तरीय विविध उत्तुंग यश
चिपळूण : ज्ञानप्रबोधिनीची भगिनी संस्था असलेल्या मातृमंदिर विश्वस्त संस्था निगडी पुणे यांच्यातर्फे सलग २९ राज्यस्तरीय व्या वर्षी आयोजित केलेल्या समुहगायन आणि विविध स्पर्धांमध्ये परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलचे गुरुकुल विभागाने भरघोस यश संपादन केले. एकूण पाच विविध स्पर्धांत सहभागी झालेल्या गुरुकुल विभागाला चार स्पर्धांमधून यश संपादन करता आले.
कोकण,मराठवाडा-विदर्भ,पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र अशा विभागाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून १२० शाळांमधून राज्यस्तरावरच्या पोवाडा गायन स्पर्धेसाठी युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुकुल विभागाने सादर केलेल्या पोवड्याला राज्यस्तरावर चौथा क्रमांक मिळाला.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागाने समुहगायन या स्पर्धेमध्ये प्रशालेने सादर केलेल्या समूहगीताला कोकण विभाग स्तरावरती तृतीय क्रमांक मिळाला तर सगळ्या विद्यार्थ्यांच्या गटाने सादरीकरण केलेल्या सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकाला कोकण विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला.
मुलांमध्ये श्रम प्रतिष्ठा जागृत व्हावी या उद्देशाने असलेल्या श्रमदान स्पर्धेमध्ये गुरुकुल विभागाने कोकण विभाग स्तरावर तृतीय क्रमांक मिळवला.
याशिवाय अध्यापक,पालक,संगणक व ग्रंथालयंविभाग यातील शिक्षक सहकाऱ्यांनी एकत्रित येऊन गायलेल्या समूहगीताचे सुद्धा मान्यवर परीक्षकांनी कौतुक केले.
गुरुकुलातील विद्यार्थ्यांना अनेक वेगवेगळी कौशल्य शिकत असताना त्या कौशल्यांचे उपयोजन करण्यासाठी या स्पर्धांमधून संधी देण्याचा प्रयत्न गुरुकुल विभागात करण्यात आला.