https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा : जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह

0 378


रत्नागिरी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. 46 – रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा. त्याचबरोबर मतदान वाढीसाठी मतदारांच्या जनजागृतीबाबत आजपासूनच नियोजन करा, अशी सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी ‍दिली.


सर्व नोडल अधिकाऱ्यांची आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, पोलीस उपअधिक्षक निलेश माईनकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदी उपस्थित होते. क्षेत्रीय स्तरावरुन प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, प्रत्येक आठवड्यात विधानसभा मतदार संघ निहाय प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला जाईल. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रत्येकांनी ‘स्वीप’चे आतापासूनच नियोजन करावे. त्यादृष्टीने सायकल रॅली काही वेगळे अनोखे उपक्रम करता येतील का, याची तयारी करावी. मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात दहा पंधरा दिवस जात असतात. मतदानाच्या दिवशी ते उपलब्ध व्हावेत, याबाबत नियोजन करावे. मतदान केंद्रांवरील सुविधा विशेषत: पाणी, वीज, स्वच्छता गृहे, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प याचेही आतापासून नियोजन करा. भरारी पथक सक्रीय ठेवा.


पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले, सेक्टर ऑफीसरने भेटी दिल्या पाहिजेत. भरारी पथकांच्या वाहनांवर जीपीआरएस आणि पीएएस यंत्रणा बसवावी. सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. कोणत्याही गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार म्हणाले, आजपासून आदर्श आचारसंहिता सुरु झाल्याने शासकीय कार्यालय परिसरातील सार्वजनिक ठिकाणचे तसेच खासगी ठिकाणचे फलक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार काढले जातील, याची दक्षता शहरी भागात मुख्याधिकारी आणि ग्रामीण भागात गटविकास अधिकारी यांनी घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने कोनशिला झाकाव्यात. त्याचबरोबर दिव्यांग मतदारांची यादीही तयार करावी, असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.