राजभाषा वक्तृत्व व निबंध स्पर्धेत पेडणेकर विद्यालय तळवडेचे सुयश
लांजा : लांजा तालुका हिंदी अध्यापक संघटनेमार्फत घेण्यात आलेल्या राजभाषा हिंदी या विषयात विविध तालुकास्तरावरील स्पर्धेत तळवडे पेडणेकर माध्यमिक विद्यालयाने सुयश प्राप्त केले आहे.
दरवर्षी हिंदी पंधरवडा साजरा केला जातो. या हिंदी पंधरवड्यातशालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेतल्या जातात.या वर्षीउर्मिला माने विद्यालय, आसगे या प्रशालेत स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.
इयत्ता नववी मध्ये शिकणारी कुमारी मुक्ता अशोक खामकर
या विद्यार्थिनीने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला तर
इयत्ता नववीमध्येच शिकणारी कुमारी गौरी प्रमोद शिंदे या
विद्यार्थिनीने निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
स्वरचित कहानी लेखन स्पर्धेत इयत्ता नववीच्या कु. सिद्धी विजय दरडे या विद्यार्थिनीने उत्तेजनार्थ (१) क्रमांक
पटकविला. या सर्व विद्यार्थिनींना विद्यालयाच्या हिंदी विषय
शिक्षिका सौ.नेहा नंदकुमार पाटोळे यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षिका यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंद जगन्नाथ पेडणेकर, मुंबई व स्थानिक कमिटी सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पाटील डी. बी. या सर्वांनी अभिनंदन केले.