Ultimate magazine theme for WordPress.

युनायटेड गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना जलतरण प्रशिक्षण

0 171

चिपळूण : पंचकोशाधारीत शिक्षण देत मुलांचे व्यक्तिमत्व घडवण्याच्या उद्देशाने चालणाऱ्या परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुकुल विभागात मार्च महिन्यात पाचवी आणि सहावीच्या मुलांसाठी नियमितपणे पोहण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

चिपळूण नगर परिषदेच्या जलतरण तलावामध्ये हे प्रशिक्षण घेण्यासाठी मुलं रोज सायंकाळी पाच ते सहा या वेळेत नियोजित वेळापत्रकानुसार अध्यापकांच्या सोबतीने जायची. मुलांच्या शैक्षणिक प्रगती सोबतच अन्नमय मनोमय कोश विकसन म्हणून मानसिक शारीरिक प्रगतीचे असलेलं महत्त्व ओळखून या उपक्रमाचे नियोजन करण्यात आलं होतं. जलतरण तलावाच्या व्यवस्थापनातील तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाने या सर्व विद्यार्थ्यांनी पोहण्याचे प्रशिक्षण घेतले.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पोहायला जाणाऱ्या पाचवी आणि सहावी इयत्तेतील सगळ्याच मुलांनी उत्तमपणे प्रशिक्षण घेऊन पोहण्याची कला अवगत केली. नियमित शाळेच्या वेळापेक्षा जास्तीच्या वेळांमधून अशा प्रकारे अनेक वेगवेगळे उपक्रम दररोज ११ तासांची विशेष शाळा असलेल्या गुरुकुलामध्ये नियमित घेतले जातात ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास साधायचे प्रयत्न नियमित केले जातात.

Leave A Reply

Your email address will not be published.