Ultimate magazine theme for WordPress.

ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेतर्फे नवनियुक्त सरपंच अजय म्हात्रे यांचा सत्कार

0 92

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते अजय म्हात्रे यांची निवड झाली आहे या निवडीमुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. या निवडीबद्दल जेष्ठ नागरिक सामाजिक संस्थेतर्फे त्यांच्या सत्कार करण्यात आला.

संस्थेचे संस्थापक राजेंद्र घरत, उपाध्यक्ष रामकृष्ण म्हात्रे,खजिनदार विजय गाडे,सहखजिनदार धनाजी सोनकर, सचिव अशोक थळी, सहसचिव प्रकाश म्हात्रे व कार्यकारी मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

या सर्वांनी सरपंच अजय म्हात्रे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था करंजा तर्फे नवनियुक्त चाणजे ग्रामपंचायतचे सरपंच अजय म्हात्रे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.