Ultimate magazine theme for WordPress.

वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पावले माचाळच्या दिशेने!

0 178

लांजा : धबधब्यांच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमुळे कडक प्रशासनाकडून लागू करण्यात आलेले निर्बंध आणि मनाई आदेश यामुळे लांजा तालुक्यातील ‘मिनी महाबळेश्वर’ समजल्या जाणाऱ्या माचाळ या पर्यटन गावाला वर्षा पर्यटनाकरिता पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. वीकेंडला शनिवारी रविवार या दिवशी माचाळला सर्वाधिक पसंती दिली जात आहे.

समुद्रसपाटीपासून सर्वाधिक उंचीवर असलेल्या लांजा तालुक्यातील माचाळला जाण्यासाठी आता थेट रस्ता झाल्याने पर्यटकांना अधिक सोयीचे झाले आहे. पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य अधिक खुलले आहे.
लांजा तालुक्याच्या पूर्व दिशेला नयनरम्य माचाळ गाव पर्यंटनाच्या दृष्टीने लक्षवेधी ठरला आहे. येथील निसर्ग संपदा पर्यटकांसाठी आकर्षित करणारे ठरली आहे.

लांजा तालुक्यातील मिनि महाबळेश्वर म्हणून माचाळ गावाला ओळखले जाते. ४०० वर्षाच्या इतिहासाची साक्ष या पर्यटन माचाळ गावाला लाभली आहे. पावसाची रिमझिम, अंगाला झोबणारा वारा, येथील थंडगार हवा, सर्वत्र हिरवाई, समोरच दिसणारा विशाळगड, उच उंच नागमोडी डोंगरकडे, सह्याद्रीच्या हिरव्यागार रांगा, नकळत दृष्टीस पडणारे वन्यजीव, थंडगार पाणी, प्राणी-पक्षांचा आवाज, मुचकुंदी ॠषींची गुंफा, मोठमोठे अनोखे वृक्ष असे हे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना खुणावते आहे. त्यामुळे या ठिकाणाला पर्यटकांची पसंती वाढती आहे. याच माचाळ या पर्यंटन गावापासून अवघ्या दोन किमी वर विशाळगड आहे. माचाळ वर्षा पर्यटनाच्या दृष्टीने अधिक सुरक्षित आहे.

या गावात अनेक वर्षाची संस्कृती रुढी परंपरा आहे. पाऊस वारा यापासून संरक्षित करणारी झापाची घरे येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षण करतात. आता या ठिकाणी आगाऊ राहण्याची जेवणाची सोय येथील गावकरी करून देतात.

लांजा तालुक्यातील वेरवली येथे धबधब्याच्या ठिकाणी एक जण बुडून मृत्यूमुखी पडल्याने लांजा तालुक्यातील प्रसिद्ध खोरनिनको धबधबा आणि इतर धबधब्यांवर मनाई आदेश आहेत. याचबरोबर लोणावळा भुशी धरण धबधब्याच्या ठिकाणी मोठी दुर्घटना घडल्याने धबधब्यांवरील पर्यटनास निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.