रत्नागिरी : गोव्यातील वेरणा ते माजोर्डा दरम्यान मार्ग दुहेरीकरणाच्या कामामुळे सोमवार दि. ५ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबईतून गोव्यासाठी सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस विलंबाने धावणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर गोव्यातील वेरणा ते माजोरडा रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या फूट ओव्हर ब्रिज काढून टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वे मार्ग दुपदरीकरणाच्या कामांतर्गत रेल्वेकडून FoB काढून टाकण्याचे काम केले जात आहे. यासाठी सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी ३ तासांचा ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. याचबरोबर दिनांक 6 फेब्रुवारी रोजी देखील दोन तासांचा ट्रॅफिक व पावर ब्लॉक घेतला जाणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर घेण्यात आलेल्या या ब्लॉक मुळे दिनांक 5 फेब्रुवारीची मुंबई सीएसएमटी ते मडगाव दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस (22229) रत्नागिरी ते करमाळी स्थानकादरम्यान एक तास विलंबाने धावणार आहे.
रेल्वेच्या या ब्लॉकमुळे दिनांक 5 फेब्रुवारीची कुलेम ते वास्को दरम्यान धावणारी डेमू स्पेशल गाडी 50 मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.
दिनांक ५ फेब्रुवारीची वास्को ते कु्लेम डेमू स्पेशल गाडी देखील एक तास विलंबाने धावणार आहे.