https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

लांजातील अतिक्रमण हटवण्यासाठी संबंधितांना तीन दिवसांची मुदत

0 60

नगर पंचायतीच्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत

लांजा : लांजा शहरातील अनधिकृत खोकेधारकांवर नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. हर्षला राणे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आज १६ खोकेधारकांना नोटिसा धाडण्यात आल्याअसून तीन दिवसात खोके हटविण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. या कारवाईचे शहरवासीयांनी स्वागत केले आहे.

जिल्हा परिषद लांजा न 05 येथील रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत खोके उभारण्यात आले आहेत. साटवली तीठा ते वाकेड जिल्हा परिषद राज्य मार्ग आहे या ठिकाणी शाळा असल्याने विध्यार्थी यांची ये जा सुरू असते समोर गॅस अजेंसी कार्यालय आहे.शाळा भरताना आणि सुटताना वाहतुकीची मोठी कोंडी होते लहान मुले पालक यांना कसरत करावी लागते या मार्गावर वाहतूक कोंडी मुले अपघात झाले आहेत. लांजा शहरात अनधिकृत खोके यांची मोठ्या fप्रमाणात उभारणी झाली आहे. राजकीय हितसंबंध यामुळे अनधिकृत खोके चा विषयकडे दुर्लक्ष होते. मात्र नुकताच कार्यभार हाती घेतलेल्या कार्यतप्तर मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. हर्षला राणे यांनी जिल्हा परिषद लांजा न. 05 या शाळेच्या मार्गावरील सर्व अनधिकृत खोकेधारक यांना नोटीसा बजावली आहेत. तीन दिवसात खोके हटविण्यास मुदत देण्यात आली आहे अन्यथा नगर पंचायत ते हटविण्यासाठी मोहीम हाती घेऊन अनधिकृत खोके हटविण्यात येणार आहेत.

नागरिकांनी या कारवाई चे स्वागत केले आहे शहरात अनेक मार्गावर अनधिकृत खोके आहेत त्यामुळे स्वच्छ आणि सुंदर लांजा करण्यात अडथळा येत आहे सुरवातीला 16 खोकेधारक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे टप्याटप्याने अन्यअनधिकृत खोके हटविण्यात येणार आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी राणे यांच्या कडे दापोली नगर पंचायतीचा अतिरीक्त कार्यभार आहे. दापोली त ही राणे यांनी अनधिकृत खोके हटाव मोहीम हाती घेतली होती. लांजा शहरात अनेक समस्या आहेत. नगर पंचायत ला अग्निशमन बंब, सुधारित पाणीपुरवठा नगररचना प्लॅन, कचरा व्यवस्थापन या बाबत नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.