https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

कोकण रेल्वेचा २१ डिसेंबरला तीन तासांचा ‘मेगाब्लॉक’

0 174

रत्नागिरी : कोकण रेल्वेकडून मडगाव ते कुमटा जंक्शन दरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी ३ तास मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कुमटा विभाग 21/12/2023 (गुरुवार) 12:00 ते 15:00 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

कोकण रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे रेल्वे सेवेवर होणारे परिणाम या प्रमाणे असतील.

गाडी क्र. ०६६०२ मंगळुरु सेंट्रल – मडगाव जं. 21/12/2023 रोजी सुरू होणारा विशेष प्रवास कुमटा स्थानकावर संपेल आणि कुमटा – मडगाव जंक्शन दरम्यान ही गाडी अंशतः रद्द होईल.

गाडी क्र. ०६६०१ मडगाव जं. येथून 21/12/2023 रोजी सुरु होणारा मंगळुरु सेंट्रल साठीचा प्रवास कुमटा स्थानकापासून नियोजित वेळेनुसार सुरु होईल. कुमटा आणि मडगाव जंक्शन दरम्यान ही गाडी अंशतः रद्द होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.