https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

रत्नागिरीतील मत्स्यसंवर्धन प्रशिक्षणात राज्यातील विविध जिल्ह्यांमधून प्रशिक्षणार्थी सहभागी

0 404
  • सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचा उपक्रम; ८ ऑगस्टपर्यंत प्रशिक्षण कार्यक्रम


रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत ‘झाडगाव रत्नागिरी येथे असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र येथे “गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन” या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दि. ६ ते ८ ऑगस्ट २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ दि. ६ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी व प्रमुख डॉ. सुरेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि लांजा येथील प्रगतशील मत्स्य शेतकरी श्री. अब्दुल रेहमान शेजवालकर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून आणि डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाच्या गीताने पार पडला.

यावेळी लांजा येथील प्रगतशील मत्स्य शेतकरी श्री. शेजवालकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांना शासनावर अवलंबून न राहता समृद्ध शेती करता यायला पाहिजे, याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना डॉ. सुरेश नाईक यांनी प्रशिक्षानार्थिना शेती व्यवसाय करताना सहकारवृत्तीचा अवलंबन करावा, असे आवाहन केले. तसेच त्यांनी शेतकऱ्याने आधुनिक विकसित तंत्रज्ञानाचा फायदा घेतला पाहिजे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण प्रशिक्षण समन्वयक डॉ. आसिफ पागारकर, सहयोगी संशोधन अधिकारी यांनी केले. त्यावेळी त्यांनी संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमाची रूपरेषा व त्यांचे महत्व विषद केले. या उदघाटन कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन, डॉ. हरिष धमगाये, अभिरक्षक यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. सचिन साटम, सहाय्यक संशोधन अधिकारी यांनी केले. यावेळी संशोधन केंद्राचे प्रा. नरेंद्र चोगले, सहाय्यक संशोधन अधिकारी आणि जीवशास्त्रज्ञ श्रीमती. व्ही. आर. सदावर्ते हे देखील उपस्थितीत होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून विशेषतः पालघर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, अहमदनगर, बीड, जालना तसेच छत्रपती संभाजीनगर येथून एकूण ३९ प्रशिक्षणांर्थीनी सहभाग नोंदविला आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत तीन दिवसात मत्स्य शेतीसाठी जागेची निवड कशी करावी? मत्स्य शेतीसाठी लागणारे तलाव बांधकाम, मत्स्य संवर्धन पूर्व तयारी कशी करावी?, पाणी दर्जा तपासणी व व्यवस्थापन, खाद्य व रोग व्यवस्थापन, काढणी व काढणी पश्चात काळजी, दर्जेदार मत्स्य बीज ओळख व वाहतुक, गोड्या पाण्यातील कोळंबी शेती, आधुनिक मत्स्य संवर्धन: बायोफ्लोक, इ., गोड्या पाण्यातील खेकडा संवर्धनाच्या संधी, शासनाच्या विविध अनुदान योजना, अर्थशास्त्र व प्रकल्प अहवाल या विषयावर तज्ञांकडून मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजनाकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. पराग हळदणकर, संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन करिता संशोधन केंद्रातील कर्मचारी श्री. मंगेश नांदगावकर, श्री. महेश किल्लेकर, श्री. मनिष शिंदे, श्रीम. जाई साळवी, श्री. सचिन पावसकर, श्री. दिनेश कुबल, श्री. राजेंद्र कडव, श्री. सुहास कांबळे, श्री. सचिन चव्हाण, श्री. प्रवीण गायकवाड, श्री. विवेक धुमाळ, श्री. तेजस जोशी, श्री. स्वप्नील आलीम, श्री. योगेश पिलणकर, श्री. अभिजित मयेकर, श्री. उल्हास पेडणेकर, श्री. दर्शन शिंदे यांनी विशेष सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.