Ultimate magazine theme for WordPress.

उद्धव ठाकरे यांची आज सायंकाळी रत्नागिरीत जाहीर सभा

0 344

महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सभा

रत्नागिरी : महाविकास आघाडी अर्थात इंडी आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज (रविवारी) सायंकाळी प्रचार सभा घेणार आहेत.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रचार सर्वांना जोर आला आहे. महायुतीबरोबरच महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात सभा, बैठक व मेळाव्यांना वेग आला आहे. दोनच दिवसांपूर्वी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राजापूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली होती. पुढील काही दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही जाहीर सभा मतदार संघात होणार आहेत.

Tआज दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी उशिराने रत्नागिरी शहरात साळवी स्टॉप येथील जलतरण तलावा नजीकच्या मैदानात उबाठा चे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची तोफ कडाडणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आयोजित या जाहीर सभेत ते काय बोलतात, याकडे रत्नागिरी वास यांचे लक्ष लागून राहिले आहे.
या सभेला महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते देखील उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी सायंकाळी होणाऱ्या या सभेची जोरदार तयारी रविवारी दुपारपर्यंत सुरू होते. उष्णतेच्या संभाव्य लाटेमुळे राजकीय पक्षांकडून संध्याकाळच्या वेळी तसेच रात्रकालीन सभा मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.