संगमेश्वर दि. २७ : धामणी तालुका संगमेश्वर येथे शेगावचे संत श्री गजानन महाराज भक्त गोपीनाथ यादव यांच्या श्री. गजानन महाराज मंदिरात ३ मार्च २०२४ रोजी प्रगट दिन सोहळ्याचे मोठ्या उत्साहात व भक्ती भावाने आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविक भक्तगणांनी उपस्थित राहून “श्रीं” च्या दर्शनाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिनांक 3 मार्च रोजी सकाळी १० ते११वा. श्रीं ची पूजा व अभिषेक, दुपारी१२:३० ते१:००श्रीं चा प्रकट सोहळा व आरती, दुपारची १:००ते १:३०श्रीं ची पोथी वाचन, दुपारी १:३०ते ३:३०श्रीं चा महाप्रसाद, सायं.३;३०ते५:३० श्रीं चा पालखी मिरवणूक सोहळा,vसायं.५:३० ते ६:०० श्रीं ती आरती,
सायं.६:००ते७:३० हरिपाठ सांप्रदाय तुरळ ,संगमेश्वर, सायं.७:३० ते ९:००सुश्राव्य कीर्तन
रात्रौ ९:०० ते १०:३० महाप्रसाद, रात्रौ १०:३० वा. नमन माभळे जाधवाडी.
गेली अनेक वर्षे गोपिनाथ यादव अगदी मोठ्या भक्तीभावाने श्री.गजानन महाराजांची अविरत सेवा करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मंदिरातून गजानन महाराजांची पालखी प्रथमच अखंड कोकण विभागातून ९८ भक्त गणांसह शेगावला गेली होती. त्यामुळे शेगावला या पालखीसह भक्तगणांचे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. यावेळी कोकणातून जाण्याचा पहिला मान मिळाला आहे.