https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

चिपळूणमधील युनायटेडच्या गुरुकुलातील बालकलाकारांनी साकारल्या ३४० गणेशमूर्ती!

0 145
  • निवडक १५० गणेश मूर्तींचे प्रदर्शन

संगमेश्वर दि. १  :  परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुकुल विभागामध्ये गुरुकुलातील विद्यार्थी आणि इयत्ता चौथीमधील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्तकौशल्यातून बनवलेल्या आकर्षक गणेश मूर्तींचे प्रदर्शन मांडण्यात आले.

गुरुकुल विभागामार्फत प्रेमजी भाई आसर प्राथमिक विभागातील चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ माझा गणपती ‘ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत इयत्ता चौथीच्या २८० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त व उत्साही सहभाग नोंदवला.

कार्यशाळेत मुलांना शाडू माती पासून गणपती तयार करणे विषयी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक गुरुकुलातील अध्यापक पराग लघाटे यांनी केले. त्यानंतर मुलांनी आपल्या कल्पनांचा उपयोग करून शाडू मातीच्या छान आकर्षक गणेश मूर्ती तयार केल्या. गुरुकुलातील आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांनी चौथीच्या कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक व सहाय्यक म्हणून मदत केली आणि पूर्ण दिवसभर कार्यशाळेचे व्यवस्थापन करण्याचा अनुभव घेतला.

तत्पूर्वी गुरुकुलातील पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्व विद्यार्थ्यांना गणपती तयार करण्याविषयी वर्गश: मार्गदर्शन करण्यात आले होते. गुरुकुलातील मुलांनीही अतिशय उत्तम प्रकारे आकर्षक गणेश मूर्ती तयार केल्या.अशा जवळपास एकूण ३४० मुलांनी तयार केलेल्या गणेश मूर्तींपैकी निवडक १५० गणेश मूर्तींचे प्रदर्शन शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी गुरुकुल विभागाच्या पोर्च मध्ये मांडण्यात आले होते. युनायटेडच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी हजेरी लावली. तसेच अनेक पालकांनी प्रत्यक्ष प्रदर्शन पाहताना प्रदर्शनाची कल्पना,मांडणी व मुलांच्यातील कला गुणकौशल्यांचे कौतुक केले.

कार्यशाळेतील गणपती मूर्तींसाठी लागणारी शाडू माती, रंग व अन्य साहित्य इत्यादी करिता लघाटे बंधू आरवली यांची कलाश्री मूर्ती शाळा आणि चिपळूण तालुक्यातील शिरगांव येथील प्रसिद्ध प्रथितयश शिल्पकार संदीप राजाराम ताम्हणकर यांचे विशेष सहकार्य लाभले. गुरुकुल विभाग प्रमुख मंगेश मोने यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झालेल्या
या प्रदर्शनाला युनायटेड इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.स्वप्नाली पाटील, उपमुख्याध्यापक संजय बनसोडे सर ,पर्यवेक्षक संदीप मुंढेकर सर त्याचबरोबर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता नाईक आणि सर्व विभागातील अध्यापकानी भेट दिली. यु.इं.स्कूलचे शाळा समिती चेअरमन अमित जोशी यांनी प्रदर्शन मांडणी व उपक्रमाबद्दल प्रत्यक्ष भेट देऊन विशेष कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.