Ultimate magazine theme for WordPress.

मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीची धडक बसून खेडनजीक रेल्वे बोगद्यात मजुराचा मृत्यू

0 700

अन्य दोघे गंभीर जखमी ; अलसुरे बोगद्यातील दुर्घटना

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर खेड रेल्वे स्थानकानजीकच्या अलसुरे येथील बोगद्यामध्ये केबलचे काम करणाऱ्या मजुरांना मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीची धडक बसून एक मजूर मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात अन्य दोन कामगार  गंभीररित्या  जखमी झाले. सोमवारी सायंकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

या संदर्भात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावरील खेडजवळील रेल्वे बोगद्यात केबलचे काम सुरू होते.  या दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीची धडक बसल्याने दोन कामगार गंभीर जखमी झाले तर एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या कामगाराचे नाव वाय. टी. राठोड  (५५, हवेरी, विजापूर- कर्नाटक ) असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्व कामगार कर्नाटकमधील विजापूरचे असल्याचे समजते.

अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. हा अपघात नेमका कशामुळे घडला, याची चौकशी कोकण रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.