Ultimate magazine theme for WordPress.

कोकण रेल्वे मार्गे बिहारमधील मुजफ्फरपूरसाठी साप्ताहिक विशेष गाडी उद्यापासून धावणार!

0 9,459
  • सावंतवाडी-रत्नागिरी-चिपळूण-पनवेल -नाशिक मार्गे बिहार ला जाणार

रत्नागिरी : वास्को-द-गामा ते बिहारमधील मुजफ्फरपुर जंक्शनपर्यंत धावणारी साप्ताहिक समर स्पेशल गाडी दिनांक 17 एप्रिलपासून सुरू होणार आहे. ही गाडी दिनांक 11 मे 2024 पर्यंत सुरू राहणार आहे.

बिहारमधील मोठ्या प्रमाणावर कामगार वर्गातील लोक महाराष्ट्रासह गोव्यात असल्यामुळे गोवा ते बिहारमधील मुजफ्फरपुर जंक्शन दरम्यान धावणारी साप्ताहिक विशेष गाडी (07309/07310) वास्को द गामा येथून बिहार मधील मुजफ्फरपुर जंक्शनसाठी दिनांक 17 एप्रिल ते 8 मे 2024 या कालावधीत आठवड्यातून एकदा दर बुधवारी धावेल.

मुजफ्फरपुर ते वास्को-द-गामासाठी ही गाडी दिनांक 20 एप्रिल ते 11 मे 2024 या कालावधीत दर शनिवारी निघणार आहे.

गाडीचे थांबे

ही गाडी मडगाव, थीवी, सावंतवाडी, रत्नागिरी, चिपळूण, पनवेल, कल्याण, नाशिक, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सटना, प्रयागराज, चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, डाणापुर, पाटलीपुत्र आणि हाजीपुर जंक्शन.

कोकण रेल्वे मार्गावरून थेट बिहारला जाणारी ही गाडी एकूण 20 डब्यांची धावणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.