Ultimate magazine theme for WordPress.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली गणपतीपुळे येथील मंदिरात पूजा!

0 568

रत्नागिरी : गोवा राज्याचे मुख्यमंत्री, भाजपचे कोकण क्लस्टर प्रमुख डॉ. प्रमोद सावंत यांनी श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे श्रींच्या मंदिरात पूजा केली. या वेळी भाजपा युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष, मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर यांनी केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये मोदी सरकार येउदे, भारत महासत्ता होउदे, महाराष्ट्र , गोवा त्याचप्रमाणे पूर्ण भारत देशातील जनता सुखी समाधानी होउदे यासाठी श्रींच्या चरणी प्रार्थना केली.

गणपतीपुळे देवस्थान मार्फत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना प्रतिमा भेट देताना

या भेटीनंतर दिवार लेखन अभियान- कार्यक्रमही पार पडला, त्या वेळी उत्तर रत्नागिरी तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे रत्नागिरी विधान सभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब माने सुद्धा उपस्थित होते व त्यांचे मार्गदर्शन ह्यासाठी लाभले .
भाजपा युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष, मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर यांनी आणि मुख्य पुजारी व डॉ चैतन्य घनवटकर अवधूत केळकर, राज देवरुखकर आणि सर्व भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मेहनत घेऊन गणपतीपुळे दौरा यशस्वी केला.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान गणपतीपुळे वातावरण भाजपमय झाले होते. मंगलमूर्ती मोरया, फिर एक बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार, भारतमाता की जय, वंदे मातरम च्या घोषणांनी परिसर यावेळी दुमदुमून गेला.

Leave A Reply

Your email address will not be published.