रत्नागिरी : कोकण आणि मध्य रेल्वेच्या सहयोगाने ०११५८ चिपळूण -पनवेल / ०११५७ पनवेल -रत्नागिरी अशी संपूर्ण अनारक्षित असणारी ८ डब्यांची मेमू स्पेशल साप्ताहिक ट्रेन दि. ४ फेब्रुवारी २०२४ पासून कोकण रेल्वे मार्गावर फक्त रविवारी धावत आहे. या विशेष गाडीची उद्या रविवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी चौथी फेरी होणार आहे. पनवेल येथून गाडी रात्री सुटत असल्यामुळे रत्नागिरीकडे येणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे
या संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारी ते ३१ मार्च, २०२४ पर्यंत केवळ दर रविवारी ०११५७ चिपळूण येथून दुपारी ३:२५ ला सुटून पनवेल येथे रात्री ८:१५ ला पोहोचेल आणि ०११५७ पनवेल येथून रात्री ८:२५ ला सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
हे देखील वाचा : Konkan Railway | चिपळूण-पनवेल, पनवेल-रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारीपासून
Konkan Railway | आंगणेवाडी यात्रेसाठी १ मार्चपासून विशेष गाड्या
०११५८ चिपळूण- पनवेल मेमूचे थांबे
अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, जिते, आपटा, रसायनी आणि सोमटणे
०११५७ पनवेल-रत्नागिरी मेमूचे थांबे
सोमटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.