Ultimate magazine theme for WordPress.

रद्द केलेल्या मेमू ऐवजी होळीसाठी दादर-चिपळूण स्वतंत्र गाडी सुरू करावी

0 241
  • कोकण विकास समितीकडून रेल्वे बोर्डासह रेल्वे मंत्र्यांना पत्र

कोकण विकास समितीकडून रेल्वे मंत्र्यांचे रेल्वे बोर्डाला पत्र
रत्नागिरी : रोह्यातील प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने रोहा ते चिपळूण मेमू लोकल ट्रेन दिनांक 15 मार्च 2024 पासून रद्द केली. परंतु, पर्यायी गाडी जाहीर केली नाही. होळीनिमित्त होणारी गर्दी, या आधी अति गर्दीमुळे झालेली आंदोलनात्मक स्थिती यांचा विचार करता चिपळूण ते दादर अशी स्वतंत्र रेल्वे गाडी चालवावी, अशी मागणी वन विकास समितीने रेल्वे मंत्र्यांसह रेल्वे बोर्डाकडे केली आहे

रायगड जिल्ह्यातील माणगाव, महाड, खेड, चिपळूण, दापोली, मंडणगड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, गुहागर तालुक्यांतील प्रवाशांची मागणी लक्षात घेता दादर चिपळूण विशेष गाडी सोडलेली नाही. त्यामुळे होणाऱ्या गर्दीची तीव्रता लक्षात घेता दादर चिपळूण गाडी तातडीने घोषित करावी अशी मागणी कोंकण विकास समितीने रेल्वे मंत्री, रेल्वे बोर्ड, मध्य रेल्वे, कोकण रेल्वे आणि संबंधित लोकप्रतिनिधींकडे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.