https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

लाडक्या बहिणींनो, खुशखबर!! बुधवारी जमा होणार खात्यात पैसे !

0 341


कितीही अडचणी आल्या तरी लाडकी बहीण योजना सुरु राहणारच : पालकमंत्री उदय सामंत


रत्नागिरी, दि. ७ : कितीही अडचणी आल्या तरी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही. ती सुरु राहणारच ! उलट पंधराशेचे २ हजार करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो, असे सांगतांनाच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे ९ तारखेला खात्यावर जमा होणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबंधित राबविण्यात येत असलेल्या इतर योजना महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी पालकमंत्री श्री.सामंत यांच्या अध्यक्षतेखाली महिला सशक्तीकरण व सक्षमीकरण मार्गदर्शक मेळाव्याचे प्रमोद महाजन क्रीडा संकुलात आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, माविमचे जिल्हा समन्वयक अमरिश मिस्त्री, तहसिलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.सामंत मार्गदर्शन करताना म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दरवर्षी ४६ हजार कोटींची तरतूद केली आहे. ही योजना बंद व्हावी, म्हणून काहीजण न्यायालयात गेले. शासनाने दिलेले ३ हजार हे महिलांसाठी ३ लाखांसारखे आहेत. या पैशातून महिला स्वत:साठी औषधोपचार करत आहेत. शिवण क्लाससाठी प्रवेश घेत आहेत. त्यातून व्यवसाय वृध्दी करत आहेता. कुटुंबातील सदस्यांवर खर्च करत आहेत. हा त्यांचा आनंद समाधान देऊन जातो. ही योजना महिला भगिनींपर्यंत पोहचविणाऱ्या अंगणवाडी सेविका, सीआरपी यांना धन्यवाद दिले पाहिजेत. ही योजना ४ लाख महिलांपर्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करुन, पोहचविणाऱ्या अधिकाऱ्यांनाही धन्यवाद देतो.
३० हजार कोटींचे प्रकल्प रत्नागिरीत आणू शकलो. यामधून मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे.

मुंबईला नोकरीसाठी जायची आता गरज नाही, असे सांगून पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, लेक लाडकी, वयोश्री, तीर्थदर्शन, युवा कार्य प्रशिक्षण, अन्नपुर्णा या सर्व योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा. येत्या ९ तारखेला ऑक्टोबर व नोव्हेंबर या २ महिन्यांचे पैसे खात्यावर जमा होतील, असेही ते म्हणाले.
यावेळी विविध विभागांच्या लाभार्थ्यांना लाभ मंजुरीचे प्रमाणपत्र, धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमासाठी ५ हजारांहून अधिक महिला उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.